आंबा हे एक असे फळ आहे कि जे सर्वाना आवडते आहे आणि आंबा हे वर्षातून एकदा येणारे फळ आहे साधारण उन्हाळ्यात आंबा हा येत असतो आंब्याच्या झाडा पासून आंबा, कैरी मिळते आणि आंबा पासून आपण ज्युस, आंब्याचा रस, नुसता आंबा खाता येतो तर कैरी पासून कैरीचे पन्हे, लोणचे , तक्कु, मुरंबा, श्रीखंड करता येते

आज आम्ही तुम्हाला आंबा लागवड कशी करावी आणि त्याची काळजी कशी ग्यावी या संबंधी माहिती देणार आहे

आंबा लागवड कशी करावी

१५ फूट क्स १५ फुट अंतराने अंतराप्रमाणे एकरी १६०-१७० केशरची लागवड करता येते. आंब्याच्या झाडांच्या योग्य वाढीसाठी उंची व फांद्यांची छाटणी हि वेळोवेळी करणे महत्वाचे असते आज.

आंबा लागवड कशी करावी

साधारण संपूर्ण फळबागांची लागवड हि पावसाळ्यात करत असतात आंबा लागवड साठी जून ते आगस्ट मध्ये कधी हि करता येते

खड्डा खोदणे

१५ फूट अंतरावर साधारण १ फूट खड्डा खोदून त्या खड्यात पूर्ण पाणी भरून ते आटल्यावर त्यामध्ये आंब्याचे रोपे लावावी, रोपे ची उंची कमीत कमी २ ते ४ फूट असावे
 

खताचे नियोजन

केले रासायनिक खताच्या तुलनेत सेंद्रिय खते हे १५ ते २० टक्कयांनी महाग असतात परंतु आंबा हे बहुवार्षिक पीक असल्याने सेंद्रिय खतांचाच वापर करण्याविषयी शेतकऱयांचा आग्रह असतो. वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी कोंबडी खताचा वापर करणे कधी हि फायदेशीर आहे जर ते शक्य नसेल तर आपण शेणखत वापरू शकतो.

मे महिन्यात आंब्याच्या रोपाच्या चारी बाजूला चार खड्डे खोदून प्रत्येक झाडाला ६ ते ७ किलो शेणखत किंवा कोंबडी खात टाकावे .सेंद्रिय खतासोबत साधारण आठ ते दहा दिवसांच्या अंतराने ते ईएमचा एक डोस देतात. एक लिटर ईएम द्रावण दोन किलो काळा गूळ वीस लिटर पाण्यात मिसळून आठ ते दहा दिवस एका ड्रममध्ये कुजवत ठेवतात. हे ईएम ठिबकच्या माध्यमातून बागेत सोडले जाते. ईएमच्या मदतीने जिवाणूंची संख्या वाढण्यास मदत होते.

 

आंब्याच्या बागेवर होणारा रोगांचा प्रादुर्भाव

बागेवर होणारा रोगांचा प्रादुर्भाव आणि त्यासंबंदी घ्यायची काळजीहे खूप महत्वाचे आहे केशर आंब्यावर सर्वात जास्त होणार रोगामध्ये प्रामुख्याने तुडतुडे मावा फुलकिडे मिलीबग या रसशोषक किडींचा किंवा अळीचा प्रादुर्भाव आढळतो जास्त आढळतो. मोहोराची बोंडे दिसू लागतानाच्या काळात व्हर्टिसिलियम लेकॅनी या जैविक बुरशीची पहिली फवारणी करावी. आणि तुडतुड्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी मोहोर फुटल्यानंतर 10 ते 20 दिवसांनी दुसरी फवारणी केली जाते.कोवळ्या मोहोरावर भुरी हा रोग येतो. त्यासाठी ट्रायकोडर्मा आणि सूडोमोनॉस यांच्या मिश्रणाची फवारणी करावी. पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी घेतो.

पाण्याचे नियोजन

पाण्याचे नियोजन संपूर्ण बागेला शक्य असल्यास ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जावे त्यामुळे पाणीच आणि मेहणतीची बचत होते आणि झाडांना पाणी चॅनल मिळते. प्रत्येक ३ ते ५ दिवसांनी २ तास सिंचनाद्वारे पाणी दिले तरी चालते.

आंब्याची फळ धारणा

आंबा लागवडीनंतर साधारण चार ते पाच वर्षांनी फळ मिळायला सुरवात होते आणि आंब्याचा हंगाम साधारण दीड ते दोन महिने चालतो.

शेतकरयांनी खालील माहिती साठी पण हे पेज शोधले आहे

 

केशर आंबा लागवड, आंबा लागवड, केशर आंबा, आंबा खत, केसर आंब्याची रोपे, आंब्याची रोपे, mango farming, kesar mango, kesar mango farming, kesar tree, ambyachi rope, amba lagvad, kesar amba,

2 thoughts on “केशर आंबा लागवड”
  1. mi ek akar madhe 15 bye 7.5 fut var kesar amba lagawad kel aahe…sir ambat anatarpik kay gheu pl margadarshan kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *