भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती आणि पशुपालन याला खूप महत्त्व आहे. पूर्वी पशुपालन हा एक जोडधंदा म्हणून पहिले जायचे परंतु नवीन पिढी याकडे एक नवीन उद्योगधंदा म्हणून पाहत आहे तर आज आपण पशुसंवर्धन विषयी काही माहिती आणि सरकारी योजना काय आहेत ते जाणून घेऊयात.

विशेष घटक योजना

विशेष घटक योजना हि समाजातील विशेष घटकातील लोकांसाठीची योजना आहे जसे कि नवबौध्द बांधव किंवा अनुसूचित जातीतील बांधवांसाठी राबविली जाते .हि योजना ७५% अनुदानावर राबविली जाते तसेच यात २५% हिस्सा हा लाभार्थी हिस्सा असतो .

या योजनेसाठी तुम्ही दोन प्रकारे अर्ज भरू शकतात .

१) दुधाळ गट वाटप

या योजनेमध्ये २ दुधाळ गाई किंवा २ म्हशी यांचा समावेश आहे .

२)शेळी गट योजना

शेळी गटामध्ये १० शेळी व १ बोकड असे या योजनेचे स्वरूप आहे .

कुक्कुटपालन व्यवसायासाठी सरकारी योजना खालील लिंक वर क्लिक करा

👇👇👇👇

👉👉�� 👉एकात्मिक कुक्कुटपालन योजना👈👈👈👈

🖕🖕🖕🖕🖕नाविन्यपूर्ण योजना (पशुसंवर्धन विभाग ,महाराष्ट्र शासन )

सन २०११-१२ पासून नाविन्यपूर्ण योजना हि सुरु करण्यात आलेली आहे .हि योजना ३ भागामध्ये विभागली आहे

१)शेळी गट

या गटामाडे १० शेळी व १ बोकड अशा स्वरूपामध्ये हि योजना राबवली जाते .

२) दुधाळ गट

दुधाळ गटामध्ये २ संकरित गाई किंवा २ म्हशी याप्रकारे हि योजना राबवली जाते .

३)कुक्कुटपालन

कुक्कुटपालनामधें १००० मांसल पक्षी याप्रमाणे या योजनेत समावेश होतो .

वरील सर्व योजना ह्या अनुसूचित जाती / जमाती यांसाठी ७५ % अनुदान या तत्वावर राबवल्या जातात तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५० % अनुदानावर राबवल्या जातात .

आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी योजना




 

हि योजना एस. टी. प्रवर्गासाठी राबवली जाते .हि योजना अनुसूचित जाती/जमाती यांसाठी ७५% अनुदानावर राबवली जाते .यामध्येसुद्धा २५% लाभार्थी हिस्सा असतो .या योजनेमध्ये तुम्ही २ प्रवर्गाकडे अर्ज भरू शकता

१)दुधाळ गट

दुधाळ गटामध्ये २ संकरित गाई /देशी गाई /२ म्हशी असे या योजनेचे स्वरूप आहे .

२)शेळी गट

शेळी गटामध्ये १० शेळी व १ बोकड अशाप्रकारे हि योजना आहे

पशुसंवर्धन विभाग विशेष घटक योजना साठी विशेष सामूहिक चर्चासत्राचे देखील आयोजन करते .

यामध्ये ३ दिवसाचे प्रशिक्षण असते .तज्ज्ञ पशुवैद्यक यामध्ये पशुपालनाविषयी पशुपालकांना मार्गदर्शन करतात.वैज्ञानिक माहिती सांगतात .

मराठवाडा योजना

मराठवाडा योजना हि केंद्रशासनाच्या एक विशेष योजना आहे .या योजनेमध्ये २ प्रकार अर्ज दाखल करता येतो

१)शेळी गट

शेळी गट योजनेमध्ये २० शेळी व २ बोकड अशाप्रकारे समावेश असतो .

२)दुधाळ गट

दुधाळ गटामध्ये तुम्ही २ म्हशींसाठी किंवा २ गाईंसाठी अर्ज करू शकता .तसेच हि योजना सर्व प्रवर्गासाठी ५० % अनुदानावर राबवली जाते

कुक्कुटविकास कार्यक्रम एक दिवशीय पक्षांचे वाटप /तलंग गटाचे वाटप

कुक्कुटविकास कार्यक्रमांतर्गत एक दिवशीय पिले वाटप हि खात्याची महत्वपूर्ण योजना आहे .यामध्ये १०० एक दिवशीय पिलांचे वाटप केले जाते .वनराजा,गिरिराजा अशा प्रजातींचा यामध्ये समावेश होतो .या योजनेमध्ये सर्व प्रवर्गातील पशुपालक अर्ज करू शकतात .हि योजना ५०% अनुदानावर चालते .

५०% अनुदानावर चाफ कटर /मुरघास (साईलेज)प्रक्रिया अनुदान

शेतकरी मित्रानो बाराही महिने पशूंना पूरक आहार हा लागत असतो .हिरवा चार हा तर गाई म्हशींचे आवडते खाद्य आहे.म्हणूनच मुरघास हा त्यासाठीचा एक अत्यंत उपयुक्त पर्याय आहे .हो योजना ५०% अनुदानावर चालते .

शेळी पालन व्यवसायासाठी खालील लिंक वर क्लिक करा

👇👇👇👇

👉👉�� 👉 शेळी पालन व्यवसाय👈👈👈👈

योजनेसाठीचा अर्ज कोठे मिळणार

सरकारी योजना काय आहेत याची माहिती आपण जाणून घेतली .पण या योजनेसाठीचा अर्ज कोठे मिळणार आणि कुठे द्यायचे हेही आपल्याला माहित असायला हवे .

वरील योजनेसाठी लागणार अर्ज हा आपल्याला कुठल्याही जवळच्या पशु वैद्यकीय दवाखान्यात मिळेल .आणि योग्य त्या प्रमाणपत्राबरोबर जोडून हा अर्ज पशु वैद्यकीय दवाखान्यात भरावा लागेल .दिलेल्या मुदतीतच अर्ज सबमिट करावा लागतो .

 




 

कुठलाही अर्ज भरायचा असल्यास सर्वसाधारणपणे त्यासाठी काय काय डोकवुमेंट्स लागतात हे सुद्धा आपल्याला माहिती असायला हवे .म्हणजे कुठलेही अर्ज भरताना आपल्याला सोपे होईल आणि वेळेत काम होईल

  • फोटो
  • आधार कार्ड
  • दारिद्र्य रेषेखालील दाखला
  • ७/१२
  • पशुपालनाचा प्रशिक्षण घेतलेले असल्यास पशुपालन प्रशिक्षण सर्टिफिकेट
  • जातीचा दाखला
  • बचत गटाचे सदस्य असल्यास बचत गट दाखला
  • स्वयं रोजगार कार्ड
  • अपत्य दाखला /छोटे कुटुंब प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड झेरॉक्स
  • ८ अ चा उतारा किंवा ग्रामपंचायत नमुना ८

कुठलीही योजना कधी सुरु होईल यासाठी तुम्ही तुमच्या तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे विचारणा करू शकतात .

वर्ष २०२१ साठी औरंगाबाद जिल्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसह पशुपालक आणि शेतकर्यांना स्वयंरोजगाराचे साधन मिळण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजनांसाठी ४ ते १८ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत .सण २०११-१२ पासून सुरु झालेल्या नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत शेळी मेंढी वाटप ,दुधाळ गाई -म्हशींचे वाटप करणे ,१००० मांसल कुक्कुट पक्षांच्या पालन साठी शेड उभारणीस अर्थसहायय ,१०० कुक्कुट पिलांचे वाटप या योजनांसाठी सन २०२१ -२२ या वर्षासाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे .केवळ ऑनलाईन पद्धतीतीनेच अर्ज स्वीकारण्यात येणार आहे .या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहे .या योजनेसाठीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तालुक्यातील पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती ,तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय किंवा जवळच्या पशु वैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा .

संपर्क क्रमांक -१९६२,

टोल फ्री क्रमांक -१८००२३३०४१८

वरील नंबरवर अधिक माहिती साठी संपर्क करावा आणि या सादर योजनेचा लाभ ग्यावा

कुक्कुटपालन व्यवसायासाठी सरकारी योजना खालील लिंक वर क्लिक करा

👇👇👇👇

👉👉�� 👉एकात्मिक कुक्कुटपालन योजना👈👈👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *