स्पिरुलिना म्हणजे काय?

स्पिरुलीना ही शेवाळवर्गीय वनस्पती आहे. तिच्यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. स्पिरुलिनाची शास्त्रीय पद्धतीने शेती केली जाते. ज्याला रेसवे पॉण्ड म्हणतात अशा हौदामध्ये स्पिरुलिनाची शेती होते. पाण्यात तयार झालेले स्पिरुलिना प्रक्रिया करून गाळून, वाळवून त्याची पावडर केली जाते. नंतर ही पावडर गोळ्या किंवा कॅप्सूलच्या स्वरूपात बाजारात आणली जाते.

स्पिरुलिनाचे फायदे

हे औषधी गुणधर्मांनी युक्त आहे. कोणत्याही ऋतूमध्ये करता येणारी ही शेती आहे. हे एक आरोग्यदायी फुड सप्लीमेंट आहे. स्पिरुलिनाच्या गोळ्या सायनस, एच. आय. व्ही. एड्स, कॅन्सर यासारख्या आजारांवर उपयोगी आहे त्याचप्रमाणे रक्तदाब, कोलेस्ट्रॉल यासारख्या आजारांवरही गुणकारी आहे. बाजारामध्ये याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यामुळे स्पिरुलिनाची लागवड नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

स्पिरुलिनाचे उत्पादन कसे करावे?

आपण जिथे स्पिरुलिना लागवड करणार आहात तेथील तापमान १५ ते ४५ अंश सेल्सिअस पर्यंत असावे परंतु 15 डिग्री सेल्सियस पेक्षा कमी तापमान नसावे.

पाण्याचा पीएच 9 pH पेक्षा जास्त असणारे पाणी वापरावे.

25 फूट लांब व दहा फूट रुंदीचा हौद तयार करावा याची उंची साधारणतः दोन ते तीन फूट असावी.

एक हजार लिटर पाण्याच्या मागे एक किलो मदर कल्चर म्हणजेच शेवाळ स्लरी  सोडाव्यात.

नत्र,स्फुरद, पालाश, खड्याचे मीठ, मॅग्नेशिअम व खाण्याचा सोडा यांचे योग्य प्रमाणात मिश्रण बनवावे लागते आणि ते यानंतर टाक्यात सोडले जाते.. दररोज योग्य प्रमाणात या मिश्रणाला पुरेसे ढवळले जाते.

कीड व रोगमुक्त शेवाळ ठेवावे लागते.

45 दिवसानंतर पाण्याच्या पृष्ठभागावर शेवाळाचा पापुद्रा तयार होतो. एकत्रित करून पापुद्रा बाहेर काढला जातो.

पाचशे मायक्रॉनच्या जाळीतून यातील पाणी पूर्णपणे काढले जाते

तयार झालेले शेवाळ बाहेर काढल्यानंतर ते ड्रायरद्वारे सुकवले जाते. त्यानंतर ग्राईंडरद्वारे पावडर तयार केली जाते. पावडर मधील मॉईश्‍चर बॅलन्स केले जाते.

 यंत्राच्या सहाय्याने टॅब्लेटस तयार केल्या जातात.

बॉटल्स मध्ये पॅक करून याची विक्री करण्यात येते.

स्पिरुलिना शेतीचे प्रशिक्षण कोठे मिळेल?

याबाबतचे प्रशिक्षण भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाच्या अंतर्गत दिले जाते.