गुलाबाची शेती कशी करावी
गुलाबाची शेती कशी करावी

गुलाबाची शेती पारंपरिक शेतीबरोबरच आता काळानुसार बाजारात कशाला जास्त मागणी आहे  हे  पाहून  शेती करायला  हवी  . तुम्ही  जर  आपल्या शेतीत नवीन काहीतरी करू पाहत असाल तर फुलांची शेती हा एक उत्तम पर्याय तुमच्याकडे असू शकतो .थोडेसे नियोजन आणि कष्ट करायची तयारी असेल तर शेती अवघड नाही .चला तर मग जाणून घेऊया गुलाबाची लागवड ,खत व्यवस्थापन ,पाण्याचे नियोजन आणि विक्री कशी करावी याबद्दल .

गुलाबाची शेती कशी करावी

 बाराही महिने भरपूर मागणी असलेले फुल म्हणजेच “गुलाब “. गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे .प्रत्येक लग्नसमारंभ असो किंवा वाढदिवस ,सभा  ,गणपती सणवार अशा अनेक कार्यक्रमासाठी गुलाबाची मागणी हि मोठ्या प्रमाणावर होत असते . वॅलेंटिने डे ला तर गुलाबाला उचांकी दर मिळत असतो . गुलकंद , अत्तर ,गुलाबजल यासाठी देखील गुलाबाच्या फुलांची मागणी होत असते . भारतामध्ये ३००० क्षेत्राखाली गुलाब शेती केली जाते युरोपात तर गुलाबाला खूप मागणी असते . जगभरात होणाऱ्या फुलांच्या उलाढालीत एकट्या  गुलाबाचा वाटा हा ३५ ते ४० टक्के आहे .

गुलाब लागवडीसाठी जमीन कशी असावी

गुलाब लागवडीसाठी जमीन हि अति भारी किंवा अति हलकी नसावी . मध्यम स्वरूपाची असावी कि जेणेकरून अतिपाऊस झाला तरी पाण्याचा निचरा झाला पाहिजे .जमिनीचा सामू हा ६ ते ७.५ असायला पाहिजे .गुलाब हे झुडूप वर्गीय असल्याने एकदा लागवड केल्यानंतर ५ ते ६ वर्ष सहज टिकते .गुलाब हे बाराही महिने येणारे पीक आहे त्यामुळे तुम्ही केव्हाही त्याची लागवड करू शकता .पावसाच्या पाण्याच्या उपलब्धीनुसार  जानेवारी -फेब्रुवारी किंवा जुने -जुलै मध्ये लागवड करू शकता .पावसाळ्यात केलेली लागवड हि जास्त यशस्वी होते .

 

जमिनीची मशागत कशी करावी

सर्वप्रथम जमीन चांगल्या प्रकारे नांगरून घ्यावी .नांगरून झाल्यावर उभा आणि आडवा रोटर मारावा .उन्हामध्ये जमीन चांगली तापू द्यावी . ५ फुटी बेड काढावे . बेड काढल्यानंतर रोपांमधील अंतर हे ५ बाय सव्वा ठेवावे लागवडीसाठी काढलेले खड्डे हे माती आणि खताने भरावे . बेसल डोस मध्ये NPK बोरॉलमक्स KP  प्लांट झाईम ,सिंगल सुपर फोस्फट ,शेणखत याचा वापर करावा .

 

गुलाबाच्या जाती

जवळपास गुलाबाच्या २० हजार जाती आहेत . आपण राहत असलेल्या हवामानानुसार जमिनीत चांगली वाढणारी टपोरी ,सुवासिक व दर्जेदार फुलांचे उत्पादन देणारी जात निवडावी . बाजारात मुख्यत्वे ग्लॅडिएटर ,अर्जुन , सुपरफास्ट ,ब्लू मून ,लेडी एक्स ,अमेरिका हेरिटेज ,लॅडोस, रक्तगंध,बोर्डीक्स  या जातीच्या फुलांची मागणी आहे

 

आंतरमशागत आणि पाण्याचे नियोजन

गुलाब लागवडीनंतर प्रत्येक रोपावर काळजीपूर्वक लक्ष द्यावे .शेत हे नेहमी तण मुक्त करावे .पावसाळ्यात जमीन पाणी साठून राहू देऊ नये यासाठी आधीच चरे काढून ठेवावी .सुरवातीला येणाऱ्या कळ्या तोडाव्यात म्हणजेच असे केल्याने कलमांची चांगली वाढ होते .कलमांना पाण्याचा तान पडू देऊ नये . योग्य वेळी गरजेनुसार वारंवार पाणी द्यावे . पावसाळ्यात गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्याने मूळ कुजतात व रोग होतात गुलाबाच्या जुन्या फांद्यांना फुले येत नाही यासाठी नवीन फांद्या येण्यासाठी वेळोवेळी छाटणी करावी वर्षातून दोनदा छाटणी करून फुलांचा बहर धरता येतो. छाटणी करताना जुन्या वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्यात .

 झाडावरील कीड

भुरी करपा ,पाने कूज काळे ठिपके  पांढरी बुरशी , मावा पाने खाणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव होतो ,ही लक्षणे तपासून बुरशीनाशकाचा वापर करावा .

 

अशाप्रकारे गुलाब तुन आपण चांगला नफा मिळवू शकता जवळपासच्या बाजारपेठेत फुले विकत येतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *