विजेची कमतरता आणि सिंचनाची सुविधा नसल्यामुळे शेतकरी पिकांना वेळेवर पाणी देऊ शकत नाही यामुळे उत्पादनामध्ये घट होते. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारांमार्फत कुसुम सोलार पंप योजना राबवली जात आहे. 2021 पासून ही योजना सुरू झालेली आहे परंतु अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचा लाभ घेता आलेले नाहीये. या योजनेसाठी पात्रता काय आहे अर्ज कसा भरायचा या सर्व गोष्टींची माहिती या लेखांमध्ये आपल्याला जाणून घेता येईल आणि आपणही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

या योजनेसाठी पात्रतेचे निकष कोणते आहेत?

ज्या शेतकऱ्यांची शेती दुर्गम भागात आहे ज्या शेतकऱ्यांकडे वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे शेतकरी या योजने अंतर्गत पात्र असतील.

ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जवळ शेततळे, बोर, विहीर, नदी, नाले असा शाश्वत पाण्याचा स्त्रोत असेल असे शेतकरी अर्ज करू शकतात.

अटल सौर कृषी पंप योजना 1 व 2, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेमध्ये लाभ घेतलेले शेतकरी पीएम कुसुम योजनेसाठी पात्र नाहीत.

एका लाभार्थी शेतकऱ्यांनी एकाच सौर कृषी पंपा करता अर्ज भरावा एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास इतर अर्ज रद्द करण्यात येईल.

शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या जमिनीनुसार हे सौर पंप मिळणार आहेत.

ज्या शेतकऱ्यांकडे अडीच एकर शेती आहे त्याला 3 एच.पी.डी.सी चा सोलर पंप दिला जातो.

अडीच ते पाच एकर पर्यंत जमीन असेल तर 5 एच.पी.डी.सी सोलर पंप दिला जातो.

पाच एकर पेक्षा जास्त शेती असणाऱ्यांना 7.5 एच.पी.डी.सी तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यासाठी अनुदान दिले जाणार आहे.

ओपन कॅटेगिरी मधल्या अर्जदाराला 90 टक्के अनुदान दिले जाते तर एससी एसटी मधील अर्जदाराला 95 टक्के अनुदान मिळते. योजनेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराला खाली दिलेल्या प्रमाणे किंमत भरावी लागेल

3 HP पंप

एकूण किंमत – 1,93,800 रुपये

सर्वसाधारण प्रवर्ग-19,380 रुपये

एससी/ एसटी प्रवर्ग-9690 रुपये

5 HP पंप

एकूण किंमत -2,69,750 रुपये

सर्वसाधारण प्रवर्ग-26,995 रुपये

एससी/ एसटी प्रवर्ग-13,488 रुपये

7 HP पंप

एकूण किंमत – 3,74,400 रुपये

सर्वसाधारण प्रवर्ग-37,440 रुपये

एससी/ एसटी प्रवर्ग- 18720 रुपये

कुसुम सौर कृषी पंप अर्ज योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?

विहीर किंवा बोर याची नोंद सातबारा सातबारावर जर एकापेक्षा जास्त लोकांचे नाव असेल म्हणजेच सामायिक सातबारा असेल तर दोनशे रुपयांच्या बॉण्डवर इतर भोगवटाधारांचं ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागेल.

आधार कार्ड

जातीचा दाखला बँक पासबुक फोटो

पासपोर्ट फोटो

कुसुम सौर कृषी पंप अर्ज ऑनलाइन नोंदणी कशी करावी?

www.mahaurja.com या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरायचा आहे. महा कृषी ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी या पर्यायावर क्लिक करून अर्जात दिलेली संपूर्ण माहिती भरावी.