सोयाबीन हे प्रमुख नगदी पीक आहे. सोयाबीन हे अतिशय कमी कालावधीत येणार गुणवत्तापूर्वक पीक आहे. शेतकऱ्यांना उत्तम बाजारपेठ मिळवून देणारे महाराष्ट्रातील हे एक मुख्य पीक आहे. आंध्र प्रदेश मध्ये सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. सोयाबीन उत्पन्नामध्ये आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र आहे. सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असल्यामुळे पौष्टिक घटक म्हणून हे वापरले जाते. सोयाबीन पिकावर प्रक्रिया करून विविध पौष्टिक पदार्थ बनवले तर प्रक्रिया उद्योगाला चालना मिळून शेतकऱ्यांसाठी अर्थार्जनाचे अनेक मार्ग उपलब्ध होतील.सोयाबीन पासून तेल आणि दूध निर्मिती हे वेगवेगळे प्रकल्प करता येतात.  सोयाबीन वर विशिष्ट प्रक्रिया कशी करावी , सोयाबीन पासून निर्माण करता येणारे पदार्थ हे या लेखांमध्ये जाणून घेऊयात.

सोयाबीन मध्ये असणारे घटक

सोयाबीन मध्ये 40% प्रथिने, 20% स्निग्ध तेलाचे प्रमाण असतं. 23% कार्बोदके विविध खनिजे आणि जीवनसत्वे आहेत. कॅल्शियम, फॉस्फरस, लोह यासारखे पदार्थ यामध्ये आढळतात आरोग्यासाठी हे खूप लाभदायी आहे. सोयाबीन पासून अनेक दुग्धजन्य पदार्थ बनवता येतात सोया दूध, सोया पनीर दही, आम्रखंड,श्रीखंड, आईस्क्रीम, लस्सी.

सोयाबीन पासून बनवता येणारे पदार्थ

सोयाबीन वर विशिष्ट प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थ बनवून त्याची विक्री करता येते. सोयाबीन पिठापासून बेकरीचे प्रॉडक्ट्स बनवता येतात जसे की बिस्किट, ब्रेड सोया, नूडल्स हे 20 टक्के सोयाबीन वापरून बनवता येतात. त्यासोबतच स्नॅक्स फूड सुद्धा या सोयाबीनच्या पिठापासून बनवतात जसे की चकली,शेव, लाडू सोयाबीनच्या पिठापासून चा ढोकळा हे सर्व पदार्थ बनवता येतात. प्रथिने, कॅल्शियम सोयाबीन मध्ये जास्त असल्याने कुपोषणांमध्ये सुद्धा याचा आहारात उपयोग केल्यास फायदा होतो. प्राणीजन्य पदार्थ कमी करून वनस्पतीजन्य पदार्थाकडे लोक आकर्षित होत आहेत त्यासाठी सोयाबीनचे आहारातले सेवन हा एक उत्तम पर्याय आहे.

सोया दूध कसे बनवावे?

एक किलो सोयाबीन पासून 7 ते 8 लिटर दूध बनू शकते. एवढ्या दुधापासून दीड किलो सोया पनीर मिळते आणि हे पनीर दहा दिवस टिकते. सोया दूध संयंत्राच्या साह्याने एका दिवसात शंभर लिटरपर्यंत दूध काढता येते. यासाठी छिलके काढलेली सोयाबीनची डाळ आठ ते दहा तास भिजवावी लागते त्यानंतर ती भिजवलेली डाळ यंत्रामध्ये टाकून 1:8 या प्रमाणात गरम पाणी टाकावे. या यंत्रामध्ये डाळ बारीक होते त्यानंतर हे मिश्रण गाळून घ्यावे. चोथा काढल्यानंतर दूध गरम करावे दूध थंड झाल्यानंतर त्यामध्ये विविध कलर फ्लेवर जसे की इलायची, रोज इत्यादी टाकून निर्जंतुक बाटल्यांमध्ये हे दूध भरून 4ते 5 डिग्री सेल्सिअस वर सहा महिने टिकवता येते. हे दूध विक्रीसाठी तयार आहे .

सोया पनीर कसे बनवावे?

वरील पद्धतीने सोयाबीन पासून दूध तयार केल्यानंतर हे दूध उकळून दोन ग्रॅम लिंबू सत्व 100 मिली लिटर मिक्स करावे .पनीर प्रेशर साह्याने त्यातील पाणी काढून टाकावे. सोयाबीन साठी व्हॅक्युम पॅकेजिंग करून दहा दिवसांसाठी 4 ते 5 डिग्री तापमानावर हे पनीर टिकते.

सोयाने/सोया नट्स

सोयाबीन साठी आठ तास भिजवून त्यानंतर त्यामध्ये वीस ग्रॅम खायचा सोडा आणि वीस टक्के मीठ घालून वाळवावे यानंतर भट्टीमध्ये हे भाजले जातात किंवा तळून थंड केल्यावर याच्यामध्ये चाट मसाला टाकून हे सोयाने तयार होतात. किंवा इलेक्ट्रिक कढईमध्ये बनवण्यासाठी सोयाबीन सुद्धा सोयाबीन भाजून सोयाने तयार करता येतात. इलेक्ट्रिक कढईमध्ये 180° तापमानावर सोयाबीन भाजता येते. 30000 रुपयांमध्ये इलेक्ट्रिक कढई घेता येते. एका दिवसाला सहा ते दहा किलोग्रॅम बनवून पॅकेजिंग करून विकता येते विविध धान्यापासून लाह्या बनवण्याचे संयंत्राच्या मदतीने सुद्धा एलपीजी गॅस चा वापर करून 50 किलो एका तासाला बनवून विविध उत्पन्न निर्माण करता येते. मिठामध्ये भाजलेली सोयानी विविध मसाले लावून चांगली पॅकिंग करून विक्रीसाठी तयार करता येतात.

सोयाबीन पासून बनवलेल्या पदार्थांची विक्री कोठे करावी?

 विविध शाळा,  हॉटेल्स, रेल्वे स्टेशन, सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी फ्रेश सोयाबीन सोया दुधाची विक्री करता येते. मॉल, स्थानिक दुकाने ,कृषी विज्ञान केंद्रांचे प्रदर्शनांमध्ये असणारे स्टॉल्स इथे सुद्धा याची विक्री करता येते. सोया पनीर ढाबे, हॉटेल्स, लग्न समारंभ, मेस या ठिकाणी विक्री करता येते . हॉटेल इंडस्ट्रीज मध्ये सोयानेना भरपूर मागणी आहे. सोशल मीडिया च्या माध्यमातून सुद्धा याची विक्री करता येते

जनावरांना सोयाबीन पेंड हे एक उत्तम पशुखाद्य म्हणून वापरले जाऊ शकते .जनावरांच्या खाद्यासाठी सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे .सोयाबीन पासून तेल काढल्यानंतर त्यापासून उरलेल्या चोथ्याचा ढेप बनवल्या जाते.

सोयाबीन प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण कोठे मिळेल?

कृषी विज्ञान केंद्र, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागामध्ये सोयाबीन पासून विविध पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. पाच दिवसांचे हे प्रशिक्षण असते प्रशिक्षण विनामूल्य असते. येथे आपण सोयाबीन पासून विविध पदार्थ बनवण्याच्या यंत्रणा सुद्धा विकत घेऊ शकतात.

शेतकऱ्यांनी स्वतःच सोयाबीन पिकवून त्यावर प्रक्रिया करून विविध उत्पादन तयार करावे. छोटे लघुउद्योग उभारून किंवा बचत गटाची स्थापना करून महिला सुद्धा हा व्यवसाय करू शकतात. उत्तम ब्रँडिंग व लेबलिंग करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा मिळू शकतो.

यशस्वी प्रक्रिया उद्योगसाठी प्रत्यक्ष युनिटला भेट द्यावी किंवा तज्ज्ञ मार्गदर्शकाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सोयाबीन उद्योगासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येतो.

सोयाबीन उद्योगासाठी जागेची आवश्यकता

सुरुवातीला घरगुती स्तरावर सुद्धा तुम्ही हा व्यवसाय करू शकतातुम्ही जर मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय करून इच्छित असाल त्यासाठी तुम्हाला दीड ते दोन गुंठे जमीन लागले किंवा  त्यासाठी साधारण सहा ते सात लाखाची मशिनरी लागेल. वीज, पाणी हे सर्व मिळून दहा ते बारा लाख रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो.

सोयाबीन पासून विविध पदार्थ बनवण्यासाठी लागणारी मशिनरी

दूध काढणी यंत्र

ग्राइंडर मिक्सर स्टीमर

व्हॅक्युम पॅकेजिंग मशीन

वेगवेगळी भांडी

अशाप्रकारे सोयाबीन पासून विविध पदार्थ तयार करून आपण नफा मिळवू शकता.