तृणधान्य पिकांच्या उत्पादनात मका हे जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रमध्ये खाद्य संस्कृती बरोबरच औद्योगिकीकरणासाठी सुद्धा मका या पिकाची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.मका पीक हे जास्त उत्पन्न देणारं आणि अधिक नफा करून देणारा पीक आहे. मका हे एकमेव असं पीक आहे ज्याची वर्षभर मागणी कायम असते. मका हे पीक मुख्यतः हिरवी कणसे आणि चारा यासाठी घेतात.

 मक्याची लागवड तीनही हंगामात करता येते, खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात मका या पिकाची लागवड करण्यात येते.धान्य पिकाबरोबरच चारा पिकासाठी सुद्धा मक्याची लागवड खूप उपयोगाची ठरते. उन्हाळी हंगामामध्ये मक्याचे पीक जनावरांच्या खाद्यासाठी खूप उपयुक्त ठरतं उन्हाळी हंगामात मक्याची चारा पीक म्हणून लागवड केली जाते योग्य प्रकारे पाणी आणि खत व्यवस्थापन केलं तर मक्याची खूप चांगल्या प्रकारे वाढ होते.

मका पिकाचे महत्त्व

मकाचा सर्वाधिक वापर हा औद्योगिक इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.मकाचा वापर विविध चारा,पोल्ट्री फार्म तसेच विविध प्रकारचे प्रक्रिया उद्योग, पशूंसाठी खाद्य म्हणून केला जातो.

मका पिकाचे वापरानुसार सहा प्रकार आहेत ते खालील प्रमाणे

साधी मका:- साधी मका पशुपक्ष्यांच्या खाद्यासाठी वापरण्यात येतो.

गुणात्मक प्रतिनियुक्त मका(QPM):- ज्या ठिकाणी प्रथिनांची कमतरता आहे अशा ठिकाणी या वाक्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.

चाऱ्यासाठी मका:- या मक्याचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी करण्यात येतो.

बेबी कॉर्न मका:- 5 स्टार हॉटेल्स मध्ये या मक्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. यापासून भजे, वडे, सूप, लोणचे यासारखे पदार्थ तयार करता येतात.

पॉपकॉर्न:- पॉपकॉर्न बनवण्यासाठी या मका चा वापर करण्यात येतो.

स्वीट कॉर्न:- स्वीट कॉर्न म्हणजेच मधुमका या मक्याचा वापर कणसे भाजून अथवा उकडून खाण्यासाठी होतो.

मका लागवड मोठ्या प्रमाणात परंतु उत्पादन कमी असण्याची कारणे कोणती आहेत?

योग्य जमिनीची निवड न करणे.

मक्याच्या योग्य जातीचा वापर न करता आंतरपीक घेणे.

रासायनिक खतांचा असमतोल वापर.

सेंद्रिय खतांचा वापर न करणे

चुकीची पेरणीची पद्धत

पेरणी योग्य वेळेत न करणे

पाणी देण्याची अयोग्य पद्धत आणि वेळ

तणांचा बंदोबस्त न करणे

मका लागवडीसाठी जमीन कशी निवडावी ?

जमीन ही काळी कसदार असावी. मका लागवडीसाठी मध्यम ते भारी खोल, पाण्याचा निचरा होणारी,अधिक सेंद्रिय पदार्थ असलेली, रेतीयुक्त, नदीकाठची गाळाची भारीतली जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 पर्यंत असावा.

मक्याच्या वाढीच्या अवस्था असतात रोप अवस्था, फुलोरातेनं आणि दाणे भरणे या तीन अवस्था असतात पेरणीनंतर साधारणतः 30 ते 35 दिवसांमध्ये पीक हे रोपावस्थेमध्ये येत असतं दीड ते दोन महिन्यानंतर फुलोरा अवस्थांमध्ये हे पीक येत असतं मक्याच्या पेरणीनंतर 70 ते 80 दिवसात कणसामध्ये दाणे भरायला सुरुवात होते असते या पिकाला त्याच्या प्रत्येक अवस्थेनुसार खत आणि पाण्याची व्यवस्थित मात्रा द्यावी लागते.

मका पिकासाठी लागणारे हवामान

मक्याच्या उत्तम वाढीसाठी 18 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान आवश्यक असतं. मका पिकामध्ये प्रकाश संश्लेषण आणि परागीभवन ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर होत असते.

मका पिकासाठी शेतीची पूर्व मशागत कशी करावी?

सगळ्यात आधी 15 ते 20 सेंटीमीटर खोल नांगरट करून घ्यावी. नांगरट चांगल्या प्रकारे केली तर निश्चितच उत्पन्न हे चांगल्या प्रकारे मिळत असतो. जमिनीमध्ये मोठमोठे ढेकळ असतील तर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या द्याव्या. कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटची पाळी देत असताना 25 ते 30 गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत संपूर्ण शेतामध्ये पसरावे असे केल्याने शेणखत हे सम प्रमाणात संपूर्ण शेतामध्ये पसरवला जाईल. मक्याच्या संकरित वाणामुळे 50 ते 60%  उत्पन्न हे मोठ्या प्रमाणावर मिळत असतं त्यामुळे संकरित वाणाचा लागवडीसाठी उपयोग करावा.

मका पिकासाठी योग्य अशी पेरणी पद्धत

सरी वरंबा पद्धत

खरीप हंगामामध्ये मका पीक घेत असताना सरी वरंबा ही पद्धत अवलंबावी.

मनुष्यचलित टोकन

बैलचलित पाभर

ट्रॅक्टरचलित स्वीट ड्रील

उशिरा आणि मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जातींसाठी ७५ सें.मी. अंतरावर ओळी आखून २० ते २५ सें.मी. अंतरावर टोकण करावी.

लवकर तयार होणाऱ्या जातींसाठी दोन ओळींत ६० सें.मी. व दोन रोपांत २० सें.मी. अंतर ठेवून वरीलप्रमाणे टोकण करावी. या पद्धतीने पेरणी करता येते.

मका या पिकाची पेरणी केव्हा करावी?

खरीप हंगामामध्ये मकाची लागवड करताना  15 जून ते 15जुलैपर्यंत पेरणी करावी.

रब्बी हंगामामध्ये 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत पेरणी करावी.

उन्हाळी हंगामामध्ये  1जानेवारी ते 15फेब्रुवारी च्या दरम्यान पेरणी करावी.

मका पिकाच्या विविध जाती

मका या पिकाच्या विविध जाती उपलब्ध आहेत. पक्व होणाऱ्या कालावधीनुसार मका या पिकाचे वेगवेगळे गट आहेत .जास्त कालावधीमध्ये पक्व होणाऱ्या, मध्यम कालावधीमध्ये पक्व होणाऱ्या तसेच लवकर पक्व होणाऱ्या जाती असतात.

आफ्रिकन टॉल

उशिरा पक्व होणारे वाण आहे. १०० ते १२० दिवसात पक्व  होणारे वाण आहे.

 हिरव्या चाऱ्यासाठी उत्तम असे वाण आहे. याची पाने ही लांब असतात.

दहा ते बारा फूट उंचीपर्यंत  हे पीक वाढते.

मांजरी

हे मध्यम कालावधीत (90 ते 100 दिवस )पक्व होणारे संमिश्र वाण आहे.

नारंगी पिवळा दाणा असणारे हे वाण आहे.

 40 ते 45 क्विंटल सरासरी धान्याचे उत्पादन यापासून मिळते.

करवीर

 हे मध्यम कालावधीत (90 ते 100 दिवस )पक्व होणारे संमिश्र वाण आहे.

हे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामामध्ये योग्य असणारे वाण आहे.

नारंगी पिवळा दाणा असणारे हे वाण आहे. खरीप हंगामामध्ये 50 ते 55 क्विंटल धान्य यापासून मिळते तर रब्बी हंगामामध्ये 65 ते 70 क्विंटल धान्य मिळते

करपा रोगासाठी हे प्रतिकारक असे वाण आहे.

 या वाणपासून 60 ते 70 टन चारा मिळतो आणि 40 ते 50 क्विंटल धान्य मिळते.

पंचगंगा

लवकर पक्व होणारे (80 ते 90 दिवस) व अति लवकर पक्व होणारे संमिश्र वाण (70 ते 80 दिवस)

या वाणाचे दाणे हे पांढरे आणि मोठे असतात अंतर विकासासाठी अंतर पिकासाठी हे योग्य असे वाण आहे करपा रोगास साधारण प्रतिकारक आहे.

 या वाणपासून साधारणता 40 ते 45 क्विंटल धान्य मिळते

एका हेक्टर साठी आठ किलो बियाणांचा वापर करावा

मका या पिकासाठी खत किती प्रमाणात द्यावे?

रासायनिक तसेच सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करावा.  प्रति हेक्‍टरी मक्यासाठी 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे. पेरणीच्या वेळेसच स्फुरद आणि पालाश ची संपूर्ण मात्रा द्यावी लागते . नत्राची मात्रा ही पेरणीच्या वेळेस 40 किलो द्यावी त्यानंतर 30 दिवसांनी परत चाळीस किलो मात्रा द्यावी. पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी तिसरी मात्रा नत्राची चाळीस किलो द्यावी.

मका या पिकासाठी पाण्याची व्यवस्थापन कसे करावे?

मक्याची पाने ही लांब आणि रुंद असतात या पिकामध्ये बाष्पीभवन क्रिया ही यांच्या पानातून होत असते त्याच्यामुळे अधिक पाणी पाण्यामधून बाहेर टाकले जात असल्याने या पिकास जास्त प्रमाणात पाण्याची गरज असते मका या पिकाच्या वाढीच्या चार महत्त्वाच्या  अवस्था असतात . या चारही अवस्थांमध्ये  पिकाच्या वाढीसाठी पाण्याची आवश्यकता असते

रोप अवस्था (पेरणी पासून 25 ते 30 दिवसांचा काळ )

तुरा बाहेर पडताना (40 ते 45 दिवस)

फुलोऱ्यात असताना (60 ते 65 दिवस )

दाणे भरण्याची वेळी (75 ते 80 दिवस)

40 ते 45 सेंटीमीटर पाण्याची आवश्यकता असते त्यासाठी चार पाळ्या द्याव्या.

मका या पिकासाठी तणनाशकाचा वापर

पेरणी केल्यानंतर अंकुर उगवण्यापूर्वी संपूर्ण शेतामध्ये ओलावा असताना प्रति हेक्टरी एक ते दोन किलो ॲट्रॉझिनचा 50% डोस द्यावा. पिक उगवल्यानंतर 1-2-4 डी ईस्टर 48 WSP (विड किलर) -0.5 ते 0.8 की/हे. द्यावे.

पाच ते सहा दिवसाच्या अंतराने मक्याच्या पिकाला पाणी द्यावं . मका पिकाची वेळेवर काढणी करणे.

अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण

मका पिकावर पडणाऱ्या अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण अळीच्या प्रभाव नियंत्रणासाठी प्रादुर्भाव दिसून येताच  स्पिनेटोराम 11.7% ,एस सी 5 मिली किंवा क्लोराट्रानिलीप्रोल 18.5% एस सी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या करण्याची शिफारस धान्य उत्पादनासाठी घेण्यात येणाऱ्या मका पिकासाठी करण्यात येत आहे.

मका पिकाची काढणी आणि साठवण

मका पिकाचे दोन पद्धतीने काढणी करता येते. दाण्यावर काळा ठिपका दिसल्यास किंवा कणसाचा पाला पिवळा झाल्यास कणसे सोलून झाडावरून काढावीत. त्यानंतर दोन ते तीन दिवस कणसे उन्हात वाळवावीत. मळणी करताना दहा ते बारा टक्के आद्रता असावी.

 मक्याचे पीक पूर्ण पक्व होण्याच्या आधी जर काढणी करायची असेल तर कणसेमध्ये 25 ते 30 टक्के आद्रता असावी धान्य चांगले वाळवावे. त्यापासून उत्तम हिरवा चारा मिळतो.

 एका हेक्टरला सर्वसाधारणपणे 40 ते 45 क्विंटल मकाचे उत्पादन होते.