नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण पाहणार आहे कि केळी लागवड कशी करावी आणि त्यासाठी कोणती कोणती मशागत करावी लागते
केळी ला भारताप्रमाणेच दुबई, सौदी अरेबिया इराण, कुवेत, जपान व युरोप या देशात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आपल्या देशातील केळी हि बाहेरच्या देशात सुद्धा निर्यात केली जाते आणि त्याद्वारे मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त होते
भारतमध्ये केळीच्या झाडाचा धार्मिक कार्यात सुद्धा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे केळी खाण्यासाठी, चिप्स आणि केळीचे पान हे जेवण करण्यासाठी ताट मानून सुद्धा वापरतात
केळीमध्ये कर्बयुक्त पदार्थचा १५ ते २०% टक्के साखर असते तर लोह खनिजे, स्निग्ध पदार्थ, ब जीवनसत्व, कॅलशिअम फॉस्पोरसयांचा आंतरभाव असतो. कच्या केळीमध्ये टॅनीन व स्टार्च चे प्रमाण असते त्याच प्रमाणे केळी मध्ये संधीवात, मधूमेह, मूत्रपिंड, हृदयविकार, दाह, इत्यादींवर साठी गुणकारी असते
केळी लागवडीसाठी जमीन
केळी लागवडीसाठी मध्यम काळी व सुपिक, गाळाची, भुसभुशित जमीन लागवडीसाठी योग्य असते आणि पाण्याचा निचरा होणारी क्षारयुक्त नसणारी जमीन केळी साठी चांगली असते
हवामान केळी लागवडीसाठी
केळी लागवडीसाठी उष्ण व दमट हवामान चांगले असते अश्या हवामानात केळीची वाढ चांगली होते, केळी साठी सदरं हवामान हे 12 ते 40 डिग्री सेंटीग्रेड पर्यंतचे तापमान या पिकास चांगले मानवते आणि त्याची फळधारणा पण चांगली होते, केळींना अति अंडी आणि अति उष्ण हवामान मानवात नाही आणि अति उष्ण हवामानात केळीची वाढ वाढ खुंटते आणि केळीचे पाने पिवळी पडतात
केली कालवडी साठी जातीची निवड
साधारणतः केळीच्या 25 ते 40 जाती आहेत शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या पोत नुसार आणि हवामानानुसार केळीच्या जातीनुसार निवड करावी कारण चुकीची जात तुम्हाला नुकसान देऊ शकते त्यामुळे आपल्या गावातील कृषी आदिकार्यास विचारपूस करून जातीची निवड करावी आम्ही खाली काही जाती नमूद केल्या आहे
- बसराई
- राजेळी
- सफेदवेलची
- लालवेलची
- वाल्हा
- सोनकेळ
- हरीसाल
केळीची मुनवेपासून लागवड
केळीची लागवड हि त्याच्या खोडापासून निघणाऱ्या मुनव्यांपासून केली जाते. मुख्य झाडाच्या बाजूला बरीच नवीन फुटवे जमिनीतून बाहेर येतात त्याला मुनवे म्हणतात आणि हेच मुनवे मूल्यासहीत काडून लागवडीसाठी वापरतात.
केली लागवडीचा हंगाम
केली लागवड हि हि उन्हाळा सोडून कधीही लागवड करता येते. जून जुलै मध्ये लागवड केल्यास त्या बागेस मृगबाग असे म्हणतात तर सप्टेबर ते जानेवारी मध्ये होणा-या लागवडीस कांदेबाग म्हणतात, आपल्याकडी पाण्याची सोया आणि हवामान यांचा अंदाज पाहून केली लागवडीसाठी योग्य हंगाम निवडावा
केळी लागवड करण्याची पध्दत
केळी लागवड करण्यासाठी साधारणतः 0.5 x 0.5 x 0.5 मीटर आकाराचे खडडे खोदून किंवा स-या पाडून केळीची लागवड करता येते. आणि दोन झाडातील अंतर शक्यतो 1.25 1.25 किंवा 1.50 मीटर असे ठेवता येते .
केळी साठी पाणी व्यवस्थापन
केळीच्या झाडांना खूप मोठ्या प्रमाणात पाणी लागते, जमिनीचा पोत, हवामान आणि झाडांची उंची पाहून पाण्याचे व्यवस्थापन करावे आणि झाडाच्या खोडाजव पाणी राहणार नाही याची काळजी घ्यावी कारण खोडाजवळ पाणी राहिल्यास खोडाला बुरशीमुळे वाढ थांबून झाड वाळून जाते.
केळी साठी खत व्यवस्थापन
जमिनीचा पोत पाऊण आवश्यक त्या खताची मात्र केळीसाठी देणे महत्वाचे असते प्रत्येक झाडास 100 ग्रॅम नत्र 40 ग्रॅम स्फूरद, 40 ग्रॅम पालाश द्यावा त्याच प्रमाणे शेणखत असल्यास केळीची वाढ चांगली होऊन चांगली फळधारणा होते
केळी वरील किड व रोग
केळीच्या झाडावर पनामा आणि शेंडे झुपका रोग मोठ्या प्रमाणात होतो, त्याचप्रमाणे पनामा, मावा, तुडतुडे. भुंगे खोडकिडा, इत्यादी रोग किंवा कीड झाडावर पडते आणि संबंधीत कीड व रोग ओळखून त्याच्यावरील औषधी घेऊन त्याची फवारणी करावी.
केळीची फळधारणा
केळीच्या लागवडीनंतर साधारणतः जातीनुसार 9 ते 20 महिन्यांनी केळी फूल खोडाबाहेर पडते. आणि 3 ते 5 महिन्यात घड तयार होतो. केळीच्या घडाने चांगला आकार घेतल्यानंतर त्याच्या टोकास असलेले वांझ केळफूल फणीपासून थोडया अंतरावर कापून टाकावी त्यामुळे घडातील केळी चांगली पोसून त्याचे वजन वाढते.
केळी पिकली कशी ओळखावी
जर केळी हि चांगले पोसून गरगरित आणि भरीव झाली असेल आणि त्याच्यावरचा कडा मोडून गेला असेल झाले की समजावे केळी हि पूर्ण तयार झाली आहे. पूर्णपणे तयार झालेला घड तीन ते चार दिवसांत पूर्ण पिकतो.