आंब्याच्या जाती ह्या भारतात खूप आहे जसे कि हापूस, दशेरी, केसर, तोतापुरी, पायरी, निलम, रत्ना, मल्लिका, लंगडा, आम्रपाली, सिंधू, सदाबहारी. आंबा असे फळ आहे कि त्याचा गोडवा आणि उपयुक्तता यामुळे आंब्याला ‘फळांचा राजा’ असे म्हणतात. आंबा पिकाखाली देशातील एकूण फळझाडांखालील क्षेत्राच्या 30% ते 40% क्षेत्र आहे त्यापासून 70-90 लाख टन इतके उत्पादन भारतात मिळते. अती थंडी असणारे काही भाग सोडल्यास जवळपास सर्वच राज्यामध्ये आंब्याची लागवड आढळून येते. आंबा लागवडीचे सर्वांत जास्त क्षेत्र उत्तर प्रदेशात असून उत्पादकतेच्या बाबतीत आंध्र प्रदेशाचा प्रथम क्रमांक लागतो. भारतातून होणाऱ्या एकूण फळांच्या आणि फळप्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या निर्यातीत आंब्याचा वाटा ६०% इतका आहे. आंब्यापासून विविध पदार्थ बनविता येतात . देशात आंबा आणि त्यापासूनच्या पदार्थ निर्यातीला भरपूर वाव आहे.

आंब्याच्या जाती

आंब्याच्या जाती ह्या भारतात खूप आहे जसे कि हापूस, दशेरी, केसर, तोतापुरी, पायरी, निलम, रत्ना, मल्लिका, लंगडा, आम्रपाली, सिंधू, सदाबहारी.

हापूस आंबा

स्वाद आणि मधुर चव असलेला हा हि आंब्याची जात सर्वात उत्क्रृष्ट आहे हा आंबा पिकल्यानंतर आकर्षक तांबूस पिवळसर रंग होतो . रंग हा शेंदरी रंगाचे रेषाविरहीत असते. फळ पिकल्यानंतर १० ते १२ दिवस टिकून राहते त्यामुळे निर्यातीसाठी परदेशात पाठवण्यासाठी हि जात चांगली आहे. या जातीच्या आंब्याचे उपपदार्थ तयार करून हवाबंद शितगृहात साठविल्यानंतरही स्वाद आणि घनता मुळच्या प्रमाणात टिकून राहते.




 

केसर आंबा :

हापूस आंबापेक्षा ३ ते ४ पटीने जास्त उत्पादन देणारी जात आहे या जातीचे लागवडी खालील क्षेत्र देशभर वाढू लागले आहे. या जातीत आंब्यांना चव आणि गोडवा हा उत्तम आणि चांगला असतो. फळ पिकल्यानंतर ५ ते ६ दिवस टिकते.

तोतापुरी आंबा

कर्नाटकातील हि मुख्य जात असून या जातीला ‘बंगलोरा’ नावानेही ओळखतात. हा आंबा दोन्ही टोकास निमुळती बाकदार असतात. रंग हिरवट, पिवळसर आणि त्यावर चमकदार तांबुस चट्टे असतात.

पायरी आंबा

हा आंबा हापूस आंब्यापेक्षा जास्त उत्पादन देणारी जात आहे. फळे मध्यम आकाराची, आकर्षक लाल रंगाची असतात. फळे रसाळ असून गोड असतात. मात्र पिकल्यानंतर ती जास्त काळ टिकत नाहीत.

दशेरी आंबा

उत्तर भारतात लागवडीखाली असलेली जात वैशिष्ट्यपुर्ण व अत्यंत मधुर चवीमुळे प्रसिद्ध आहे. उत्तर भारतापेक्षा महाराष्ट्रात फळे लवकर तयार होतात. फळ मध्यम आकाराचे, लांबट, शेंदरी, पिवळ्या रंगाचे असून स्वाद व चव उत्तम असते. रेषाविरहीत गर असल्याने फळ कापून खाण्यासाठी शीतगृहात साठविण्यासाठी तसेच फोडी करून हवाबंद डब्यात ठेवण्यासाठी उत्तम आहे. मोहोरातील पर्णगुच्छ ही विकृती या जातीमध्ये जास्त आढळते.

लंगडा आंबा

हा आंबा उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळतो. तसेच ही जात कोणत्याही ठिकाणी वाढू शकते. आंबा हा हिरवट व मध्यम आकाराची लांबटगोल असतात. आतील गर हा गोड असून कोय लहान असते. पण ह्या आंब्याची साल पातळ आहे त्यामुळे हा आंबा पिकल्यानंतर जास्त काळ टिकत नाहीत.

सिंधू आंबा

हि आंब्याची जात कोकण कृषी विद्यापीठाने १९९२ साली रत्ना (मादी) आणि हापूस (नर) यांच्या मिलनातून जात निर्माण केली आहे, या जातीच्या फळांचा रंग आणि चव आकर्षक असून दरवर्षी फळे मिळतात. फळे रेषाविरहीत असतात. या जातीचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे फळांमधील कोय ही अतिशय पातळ असून कोय आणि गर यांचे प्रमाण १:२६ एवढे आहे. फळांमध्ये साका होत नाही. फळे नियमित येत असून फळातील गार मधूर असतो.

हि आंब्याची जात कोकण कृषी विद्यापीठाने १९९२ साली रत्ना (मादी) आणि हापूस (नर) यांच्या मिलनातून जात निर्माण केली आहे, या जातीच्या फळांचा रंग आणि चव आकर्षक असून दरवर्षी फळे मिळतात. फळे रेषाविरहीत असतात. या जातीचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे फळांमधील कोय ही अतिशय पातळ असून कोय आणि गर यांचे प्रमाण १:२६ एवढे आहे. फळांमध्ये साका होत नाही. फळे नियमित येत असून फळातील गार मधूर असतो.

मल्लिका आंबा




 

हि जात भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली यांनी नीलम (मादी) आणि दशेरी (नर) यांच्या संकरापासून निर्माण केली आहे आणि याची फळे हि मध्यम आकाराची बारीक असून आंबा दरवर्षी येतो.

रत्ना आंबा

हि जात कोकण कृषी विद्यापीठाने नीलम (नर) आणि हापूस (मादी) १९८४ साली प्रसारित करण्यात आली असून यांच्या मिलनातून तयार केलेली आहे आणि फळे दरवर्षी येतात. या जातीची फळे हापूसपेक्षा मोठी असून घट्ट आणि रेषाविरहीत असतात. फळांचा स्वाद आणि चव साधारण हापूस सारखीच आहे. फळे पिकल्यानंतर ८ दिवस चांगली टिकतात. फळांमध्ये साका होत नाही.

आम्रपाली आंबा

ही जात भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली यांनी दशेरी (मादी) आणि निलम (नर) यांच्या संकरापासून निर्माण केली असून फळे उत्तम चवीची स्वादिष्ट आहे आणि त्याच बरोबर आंबा हा रेषाविरहीत असतात. फळे दरवर्षी येतात पण हि फळे उशीरा तयार होतात. झाडे हि आकाराने खूप लहान असतात त्यामुळे एकरी आंब्याच्या झाडांची संख्या अधिक बसते आणि या झाडांना पाण्याची गरज इतर जाती पेक्षा अधिक असते.

सदाबहारी आंबा

या जातीचा आंबा हा बाराही महिने आंबा देत असतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *