डेअरी फार्म व्यवसाय कसा सुरु करावा

 

आज आपण पाहणार आहे कि डेअरी फार्म व्यवसाय कसा सुरु करावा ? डेअरी फार्म म्हणजे काय तर दुग्धव्यवसाय . दूध हि एक अशी गोष्ट आहे जी रोजच्या जीवनामध्ये निरंतर लागणारी आहे.रोजच्या आहारामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थाला मोठी मागणी असते .इतर व्यवसायाच्या तुलनेत या व्यवसायात अर्थार्जनाची शाश्वती निश्चित आहे . दुधाची मागणी हि सातत्याने वाढतच आहे .त्यातच दूध हे जर खात्रीपूर्वक आणि भेसळ नसणारं असेल तर दुधाला दर सुद्धा चांगलाच मिळतो . या व्यवसायासाठी शैक्षणिक आर्थिक उप्लब्धतेपेक्षा चिकाटी , दृढ निश्चय , सातत्य , योग्य माहिती तसेच प्रामाणिकपणा असणे गरजेचं आहे . तुम्ही मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करू इच्छित असाल तर मोठं मोठ्या दूध  कंपन्यांशी संपर्क साधून  देखील तुम्ही त्यांना दुधाचा पुरवठा करू शकता आणि चांगल्या प्रकारे नफा मिळवू शकता .
 

डेअरी फार्म व्यवसाय कसा सुरु करावा

एक यशस्वी दुग्धव्यवसायाचे  गुपित सांगायचे  म्हणजे जनावरांच्या खाद्यात मिळवलेली स्वयंपूर्णता, उत्पादन खर्चात केलेली बचत, चारा, दुधाची दर्जेदार कॉलीटी आणि सातत्य.

दूध व्यवसाय करताना यांच्यातील बारकावे समजून घेणे गरजेचे आहे .

एक चांगले डेअरी फार्म सुरु करण्यासाठी खालील माहिती असणे गरजेचे आहे.

डेअरी फार्म व्यवसाय कसा सुरु करावा
डेअरी फार्म व्यवसाय कसा सुरु करावा

गाई कशा प्रकारची असावी

डेअरी फार्म करताना सर्वात आधी महत्वाचे असते कि कोणत्या जातीची गायी व म्हशी निवडाव्यात .पशूंची शारीरिक स्थिती , दिवसाला दूध किती देतात हे गाई  खरेदी करण्याआधी तपासून पाहावे . संकरित गाई , देशी गाई ,दुधाळ म्हशी आणि गावठी दुधाळ गाई या प्रामुख्याने दुधासाठी वापरल्या जातात .

गाई ची निवड कशी करावी ह्या संबंधी आम्ही लेख लिहिला आहे ते पाहण्यासाठी दूध उत्पादन वाडीसाठी गाईची निवड कशी करावी ह्या पोस्ट वर जा

 

 

गाईंच्या जाती

 • मालवी
 • नागौरी
 • साहिवाल
 • थारपारकर
 • डज्जल
 • गीर गाई
 • निमाडी
 • लाल सिंधी गायी
 • लाल कंधारी गायी
 •   या काही गाईंच्या जाती आहेत .

म्हशींच्या जाती

 • मेहसाणा
 • पंढरपुरी
 • मुऱ्हा
 • सुरती

जास्त दूध देणाऱ्या जातिवंत गाई ,म्हशी त्यांना लागणार वातावरण याबाबतची योग्य ती माहिती मिळवावी .
 

जमीन आणि गोठा किंवा शेड कसे असावे

 • यशस्वी दुग्धव्यवसायासाठी गोठा व्यवस्थापन महत्वाचे असते . गाईचा गोठा हा स्वच्छ , मोठा ,हवेशीर तसेच भरपूर सूर्यप्रकाश येणार  असावा .वेळच्या वेळी वैद्यकीय तपासणी तसेच योग्य आहार देऊन आपले पशुधन हे निरोगी राहून दूध उत्पादन चांगले देऊ शकते. 
 • आपल्याकडे चाऱ्याची उपलब्धता हि मोठ्या प्रमाणावर असली पाहिजे साधारण ५ ते ७ गाईंसाठी एक एकर जमिनीचा चारा लागू शकतो .
 • गोठ्यामध्ये हवा खेळती राहावी व योग्य तो सूर्यप्रकाश मिळावा यासाठी योग्य बांधणी करावी .
 • गाईंना चारा खाताना जास्त वाकावे लागू नये यासाठी ३ फूट उंचीवर गव्हाण असावे .
 • गव्हाणीमध्येच पिण्याच्या पाण्याची सोय करावी जेणेकरून पाण्यासाठी बाहेर जावे लागणार नाही .
 • गोमूत्र वाहून नेण्यासाठी स्वतंत्र बांधणी करावी जेणे करून गोठ्यामध्ये स्वछता राहील आणि गाई या आजारी पडणार नाहीत .
 • गाईंना चारा आणि पाणी देण्याच्या वेळा ठरून पाळाव्यात .
 • गाई बसण्याची जागा तसेच गाईची कास हि कोरडी असावी
 • मुक्त संचार गोठा पद्धतीचा देखील वापर करता येऊ शकतो .
डेअरी फार्म शेड कसे असावे
डेअरी फार्म शेड कसे असावे

गाईंचा आहार कसा असावा

एक यशस्वी दुग्ध यवसायासाठी चाऱ्याचे नियोजन हे सर्वात महत्वाचे ठरते . कुठल्याही वेळी तुमच्याकडे पुढील वर्षभर पुरेल इतका चारा असायला पाहिजे. पौष्टिक आणि सकस आहार दिल्यावर गाई ह्या चांगल्या प्रकारे दूध देतात. घरचा चारा असल्यास खर्चामध्ये बचत होती.गाईंच्या आहारामध्ये मिनरल मिक्सचर ,कडबा पेंढी , मका , हिरवा चारा , ऊस याचा उपयोग करू शकता .

 

मुरघास
 

चारा साठून ठेवण्यासाठी मुरघासाची निवड करता येते.

 मुरघास बनवण्यासाठी खालील पिकांचा वापर करू शकता :-

 • मका
 • नेपियर घास
 • बाजरी
 • ज्वारी 

वरील सर्व पिके हे दाण्यामध्ये असताना गुळाचे पाणी आणि मीठ टाकून तो घास एका मोठ्या प्लास्टिक पिशवीमध्ये साठून त्याला हवाबंद करून वर्षभर वापरता येतो परंतु ह्या मुरघासाला हवा आणि पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी नाहीतर तो खराब होऊ शकतो .

मुरघास
मुरघास

 

 दुग्ध व्यवसायाचे अतिरिक्त फायदे

गाईंपासून मिळणाऱ्या शेणखताचा तुम्ही स्वतःच्याच शेतीत उपयोग करू शकता किंवा हे खत विकू देखील शकता .गाईपासून कालवडी मिळू शकतात .

२ ते ३ वेत झालेल्या गाई विकू शकता .

उरलेल्या दुधापासून तूप, खवा  बनवता येतो

 

गाईंचे आरोग्य

गाईंचा गोठा हा नेहमी स्वछ ठेवावा . वेळच्या वेळी लसीकरण करावे .डिवर्मिंग म्हणजेच जंतनाशक औषध आणि बायो security स्प्रे मारून घ्यावा .स्वच्छ दूध निर्मितीसाठी कासेची काळजी घेऊन प्री डीप-पोस्ट डीप वापरावे. CMT किट वापरून  वेळच्या वेळी दगडी चाचणी करावी. कृमिनाशक , गोचीडनाशक औषधोपचार नियमित करावे.

दूध टिकवण्यासाठी ४ अंश सेलसिस तापमानावर दुधाची साठवणूक करावी .यापेक्षा अधिक तापमान असेल तर दुधातील बॅक्टरीया वाढून लॅकटोजचे लॅक्टिक ऍसिड मध्ये रूपांतर करतात आणि त्यामुळे दूध फाटते.यासाठी दुधाची भांडी स्वच्छ असावीत .अशाप्रकारे दूध संकलन व साठवणूक करताना योग्य काळजी घेतल्यास नुकसान टाळता येते.
 

गाईंचे प्रजनन नियोजन

गायी व म्हशी नियमित माजावर येणे ,वेळेवर विणे तसेच गाभण राहणे हे यशस्वी दूध व्यवसायासाठी खूप महत्वाचे आहे .गाई व म्हशींच्या प्रजननाविषयी सर्व नोंदी वहीत करणे आवश्यक आहे असे केल्याने पुढील विण्याची व माजाची तारिक अचूक काढता येते

तुमच्या गोठ्यामध्ये प्रत्येक वेळी दूध उत्पादन हे सामान असायला हवे त्यासाठी गाई व्यायनाचे नियोजन करावे .

 

दूध उत्पादनाचं नाही तर याजोडीने तुम्ही दूध संकलन , दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करून युवकांना आर्थिक प्रगती साध्य करता येईल .यासाठी शासनाच्या विविध योजना व अनुदान तत्वावर बँकाकडून कर्ज देखील मिळवता येते .

पशुधनासाठी लागणारे पोषक वातावरण , औषधोपचार लसीकरण, पोषण आहार ,वर्षभर पुरेल अश्या हिरव्या वैरणाची उपलब्धता व त्याची साठवणूक योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे . यासोबतच दूध व दुग्धजन्य पदार्थ बनवण्याचे पद्धत , भांडवल ,  लागणारे मनुष्यबळ,वाहन ,दूध विक्रीची व्यवस्था यासोबतच योग्य नियोजन व व्यवस्थापन हे एक यशस्वी डेअरी फार्म करण्यासाठी गरजेचे आहे .  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *