पपई या झाडांचे मूलस्थान मेक्सिको येथील असून आता ह्या झाडांची लागवड हि प्रत्येक उष्ण कटिबंधातील देशांत वाढत चालेलं आहे, भारतात पण पपई च्या लागवडीचे क्षेत्र वाढत चालेलं आहे, आज आपण पपईविषई खालील मुद्यावर माहिती देणार आहे

  • पपईचा उपयोग
  • पपईची लागवड कधी करतात
  • पपईचा औषधी उपयोग
  • पपई लागवडीसाठी जमीन
  • पपई लागवडीसाठी हवामान
  • पपईच्या जाती
  • पपई लागवडीसाठी पूर्व मशागत
  • पपईची नर मादी रोपे
  • पपईसाठी पाणी व्यवस्थापन
  • पपईसाठी खत व्यवस्थापन
  • पपईत कोणती आंतरपिके घ्यावी
  • पपई काढणी कधी करतात

पपईचा उपयोग

पपई मुले भूक वाढते आणि आपली शक्ती वाडवण्यासाठी मदत होते. प्लीहा, यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि काविळ यासारख्या रोगांसाठी सुद्धा हे फळ वापरले जाते. पपईचा केकमध्ये, तसेस पपई चा उपयोग मसाला पानामध्ये वापरण्यात येणारी जाम-जेली, टुटी फ्रुटी,पदार्थ तयार करण्यासाठी होतो,

पपईची लागवड कधी करतात

पपईची लागवड हि वर्षातून तीन वेळा करता येते ते म्हणजे जून-जुलै दरम्यान, सप्टेंबर-ऑक्‍टोबर दरम्यान किंवा फेब्रुवारी-मार्च दरम्यान करता येते




 

पपईचा औषधी उपयोग

पपई मध्ये खूप प्रकारचे औषधी औषधी गुणधर्म आहे जसे कि मधुमेहींसाठी पपई हि गुणकारी, वजन घटवण्यास मदत होते, शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करते, डोळ्यांची योग्य निगा राखते आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते, मासिक पाळीमध्ये त्रास कमी होतो, सांधेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते, कर्करोगापासून बचाव होतो, आणि आपली पचन क्रिया सुधारते

पपई लागवडीसाठी जमीन

पपईच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि माध्यम ते भारी असलेली जमीन पपई लागवडीसाठी चांगली असते. खऱ्या आणि पनीयच निचरा न होणाऱ्या जमिनीत पपई लागवड करू नाही

पपई लागवडीसाठी हवामान

पपईच्या वाढीसाठी हवामान हे उष्ण व दमट आवश्‍यक असते. जर तापमान 09 ते 13 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल तर फळे पक्व होण्याची क्रिया थांबते. तसेच झाडाची वाढ व फळधारणा होत नाही, जोरदार वारे, अति थंडी पपई पिकाला जमत नाही

पपईच्या जाती

पपईच्या अनेक जाती आहे त्यामध्ये सर्वात जास्त लागवड करण्यासाठी को- ६, पुसा ड्वार्फ, पुसा नर्हा, पुसा जायंट, पको-५, पेपेनसाठी को -६, व पुसा मेजेस्टी, पई सिलेक्शन क्र. १,२,३ व ५, तैवान या सर्व जाती वापरल्या जातात

पपई लागवडीसाठी पूर्व मशागत

पपई लागवड करण्या पूर्वी जमिनीची उभी आणि आडवी दोन्ही बाजूने नांगरणी करून घ्यावी त्यानंतर त्यावर ३ ते ४ पाळ्या देऊन जमीन सपाट व भुसभुशीत करून घ्यावी. पपई लागवड करण्यासाठी साधारण १.८x१.८ मीटर अंतरावर ४५x४५x४५ सें.मी. आकारमानाचे खड्डे करून घ्यावेत

पपईची नर मादी रोपे

पपईची नर आणि मादी ची रोपे ओळखून शेतात फक्त मादीची रोपे ठेवून द्यावी नर रोपे हि फक्त ५ ते ६ च ठेवावी आणि बाकीची नर रोपे कडून त्या ठिकाणी मादीची रोपे लावावी.

पपईसाठी पाणी व्यवस्थापन

पपईसाठी पाणी व्यवस्थापन करताना पपईला उन्हाळ्यात ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे, आणि हिवाळ्यात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पावसाळ्यात पाणी देण्याची गरज नसते जर पावसात खंड पडला तर 7 ते 70 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

पपईसाठी खत व्यवस्थापन

पपईचे खत व्यवस्थापन करताना पपई झाडांची जलद वाढ होण्यासाठी आणि जास्त उत्पादन साठी त्यांना नत्र १.४४ %, स्फुरद ०.२५ % आणि पालाश २.५२ % असणे आवश्‍यक असते त्याच प्रमाणे झाडांना खालील प्रमाणे वर्षभर खताची उपलब्धता करून द्यावी. पपई पिकास खालील प्रमाणे खत हे ग्रॅम नुसार प्रतिझाड द्यावे

महिना नत्र स्फुरद पालाश

पहिला ५० ५० ५०

तिसरा ५० ५० ५०

पाचवा ५० ५० ५०

सातवा ५० ५० ५०

एकूण २०० २०० २००




 

पपईत कोणती आंतरपिके घ्यावी

पपईत आंतरपिके घेण्यासाठी घेवडा, चवळी, कांदा, मुळा, भूईमूग, वाटाणा या पिकांची आंतरपिके म्हणून लागवड करता येते

पपई काढणी कधी करतात

पपई काढणी हि पपईची लागवड केल्या पासून दहा ते बारा महिन्यामध्ये पपई काढणीस येते. फळ काढणीसाठी तयार झाल्यावर पपई वर पिवळे डाग पडतो आणि फळातून निघणारा चीक पातळ पाण्यासारखा बाहेर निघतो तेव्हा समजायचे कि पपई हे फळ काढणीसाठी तयार झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *