Pomegranate Farming डाळिंबाची फळबाग लागवड करणे हे एक अत्यंत फयदेशीर आणि अधिक उत्पन्न देणारे फळ आहे

डाळींबाच्‍या रसात 10 ते 15 टक्‍के साखरेचे प्रमाण असते आणि पचनास हलकी असते तसेस क़ुष्‍टरोगावर डाळींबाचा रस गुणकारी असतो असे डॉक्टर सल्ला देत असतात , डाळिंबची सर्वात जास्त लागवड हि अहमदनगर, सांगली, वाशिमपुणे, सोलापूर या जिल्‍हयात प्रामुख्‍याने होत असून महाराष्ट्रातील इतर जिल्‍हयातही मोठया प्रमाणावर डाळिंबाची लागवड होते, महाराष्‍ट्रामध्‍ये डाळिंब पिकाखाली 70000 ते 75000 हेक्‍टर क्षेत्र असून त्‍यापैकी सुमारे 30000 ते 40000 हेक्‍टर क्षेत्र उत्‍पादनाखाली आहे म्हणजे या शेतर्कहीली सध्या शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरु आहे

आपण आज डाळिंबद्दल खालील मुद्या वर माहिती देणार आहोत

 1. डाळिंबाच्या लागवडीसाठी जमीन
 2. डाळिंबाच्या साठी हवामान
 3. डाळींबाच्‍या जाती
 4. डाळिंबाच्या लागवडीच्या पद्धती
 5. डाळिंब खत व्यवस्थापन
 6. डाळिंब पाणी व्यवस्थापन
 7. डाळिंब बहार धरणे
 8. डाळींबावरील रोग
 9. डाळिंबाची मशागतीची कामे

 

डाळिंबाच्या लागवडीसाठी जमीन

दालमीबाची लागवड हि कोणत्‍याही जमिनीत घेण्‍यात येते. सदरं अति हलक्या जमिनीपासून भारी किंवा मध्‍यम काळी व सुपीक जमिन डाळींबाच्‍या लागवडीसाठी चांगली असते या जमिनीत झाडांची वाढ चांगली होते, हलक्‍या प्रतीची, खडकाळ मुरमाड डोंगर उताराच्‍या जमिनी सुध्‍दा चालतात. मात्र जमिनीत पाण्‍याचा निचरा होणे आवश्‍यक आहे.

डाळिंबाच्या साठी हवामान

डाळींबाच्या झाडांसाठी थंड व कोरडे हवामान मानवते, तसेस झाडांना फुले लागल्‍यापासून फळे होईपर्यंतच्‍या काळात भरपूर उन व कोरडे हवामान असल्‍यास चांगल्‍या प्रकारची फळे तयार होतात आणि त्याची वाड चांगली होते.

 

डाळींबाच्‍या जाती

मृदुला, मस्‍कत, जी १३७, फुले आरक्‍ता, भगवा, गणेश

डाळिंबाच्या लागवडीच्या पद्धती

डाळिंबाच्या लागवडीसाठी जमिनीत 5 × 5 मिटर अंतरावर खड्डे करून डाळिंबाची लागवड करावी. खंडाची खोली आणि रुंदी हि त्‍यासाठी 50 × 50 × 50 सेमी आकाराचे असावी

डाळिंब खत व्यवस्थापन

१ ते ४ वर्षापर्यंत डाळींबाच्‍या प्रति झाडासाठी खालील प्रमाणे रासायनीक खते द्यावीत

१ले वर्ष – 125 ग्रॅम: 125 ग्रॅम: 125 ग्रॅम (नत्र:स्‍फूरद:पालाश)

२ले वर्ष – 250 ग्रॅम: 250 ग्रॅम:250 ग्रॅम (नत्र:स्‍फूरद:पालाश)

३रे वर्ष – 500 ग्रॅम: 250 ग्रॅम:250 ग्रॅम (नत्र:स्‍फूरद:पालाश)

४थे वर्ष – 500 ग्रॅम: 250 ग्रॅम:250 ग्रॅम (नत्र:स्‍फूरद:पालाश)

5 वर्षानंतर – त्‍येक झाडास 10 ते 40 किलो शेणखत आणि 600 ग्रॅम नत्र 250 ग्रॅम स्‍फूरद व 250 ग्रॅम पालाश दरवर्षी द्यावे

 

डाळिंब पाणी व्यवस्थापन

डाळिंबाच्या झाडाला फुले येण्‍यास सुरुवात झााल्‍यानंतर फळे उतरुन घेईपर्यंतच्‍या काळात नियमित व पुरेसे पाणी द्यावे. पाणी कमी देण्यात आल्यावर फुलांची गळ होते आणि झाडांची वाढ कमी होते. पावसाळयात पाऊस न पडल्‍यास आवश्यकतेप्रमाणे पाणी द्यावे व पुढे फळे निघेपर्यंत 8 ते 10 दिवसांच्‍या अंतराने पाण्‍याची पाळी द्यावी. फळाची तोडणी संपल्‍यानंतर बागांचे पाणी तोडावे.

डाळिंब बहार धरणे

आंबिया बहार हा जानेवारी फेब्रूवारी येतो तर त्याचे फळ जून ते ऑगस्‍ट मध्ये येते

मृग बहार हा जून ते जूलै येतो तर त्याचे फळ नोव्‍हेबर ते जानेवारी मध्ये येते

हस्‍तबहार हा सप्‍टेबर आक्‍टोबर येतो तर त्याचे फळ फेब्रूवारी ते एप्रिल मध्ये येते

डाळींबावरील रोग

डाळिंबावर मर रोग पडत असतो या रोगामुळे डाळींबाचे झाड निस्‍तेज आणि सुकलेले दिसते. सुरवातीला झाडांची पाने पिवळी पडतात आणि फळांची गळती सुरु होते आणि काही दिवसांनी काही फांदया पूर्णपणे वाळतात आणि नंतर काही दिवसांनी संपूर्ण झाड वाळते

डाळिंबाची मशागतीची कामे

 • दर महिन्‍याला एक किंवा दोन किलो शेणखत प्रति झाड जमिनीमध्‍ये खोडाजवळ मिसळून दयावे.
 • मर झालेली झाडे त्‍वरीत काढून टाकावीत.
 • झाडांना नियमित आवश्यकतेप्रमाणे पाणी द्यावे
 • बागेत गावात राहणार नाही याची काळजी ग्यावी.
 • झाडांचे नियमित निरीक्षण करावे जेणे करून झाडावर पडणारे रोग किडे यावर आपले नियंत्रण राहील
 • झाडांच्या खोडाला बोर्डो पेस्ट लावावी

डाळिंबा लागवडी विषयी आधीक माहिती

डाळिंबा लागवडी विषयी आधीक माहिती साठी खालील विषयी google वर माहिती शोधू शकतात

डाळींब खत व्यवस्थापन

डाळिंब खाण्याचे फायदे

डाळिंब व्यवस्थापन pdf

डाळिंबाच्या जाती

डाळिंब रोग व उपाय pdf

Dalimb in english

डाळिंबावरील तेल्या रोग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *