बंगालच्या उपसागरामध्ये हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असल्यामुळे कमी हवेचा दाब महाराष्टातून गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने जाणार आहे परिणामी संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेचा दाब जस जसा तीव्र स्वरूपाचा होत जाईल तसा तसा पाऊस देखील वाढत जाईल. गेल्या दोन दिवसापासून सर्वत्र पावसाच्या सरी बरसत आहे. येत्या चार ते पाच दिवसामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दोन दिवसापासून  कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली तर काही ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

कोकण गोवा हवामानाचा अंदाज

येत्या ९ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान  कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार आहे तर काही ठिकाण जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. तर उर्वरित ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

मध्य महाराष्ट्र

पुढील काही दिवस घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मराठवाडा

मराठवाड्यामध्ये गेल्या २ दिवसापासून बऱ्याच ठिकाणी श्रावण सरी बरसत आहे. येणारे ४ ते ५ दिवस मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस होईल तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

विदर्भ

विदर्भात देखील यावर्षी जोरदार पाऊस झालेला आहे. येणाऱ्या ४ ते ५ दिवसात विदर्भात मेघगर्जनेसह आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.