राज्यभरात डिसेम्बरच्या पहिल्याच दिवशी अवकाळी पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली आहे. यामुळे महाराष्ट्रात अस्मानी संकट उभे ठाकले आहे .अवकाळी पावसाने पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे .संततधारेने गहू , हरभरा यासारख्या रब्बी पिकांचेही नुकसान झालेले आहे .एकीकडे राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे तर दुसरीकडे मात्र हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. ऐन थंडीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे. अशातच ‘जोवाड’ चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्ष्यदिपच्या परिसरात चक्रीवादळ तयार झाल्यामुळे पाऊस पडत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने सोबतच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र असल्याने आंध्र प्रदेश तामिळनाडू राज्यात देखील पाऊस पडत आहे. अशातच राज्यात देखील अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने पावसाची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे.
महाराष्ट्र राज्याला येणाऱ्या दोन दिवसात ‘जोवाड’ चक्रीवादळापासून तयार झालेल्या वातावरणामुळे पाऊसाचा धोका; तयार झाला आहे
अधीच अवकाळीमुळे पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे आणि आता पुंन्हा आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
एकीकडे राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे तर दुसरीकडे मात्र हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. ऐन थंडीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे. अशातच आता ‘जोवाड‘ चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्ष्यदिपच्या परिसरात चक्रीवादळ तयार झाल्यामुळे पाऊस पडत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने सोबतच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र असल्याने आंध्र प्रदेश, तामिळनाडू राज्यात देखील पाऊस पडत आहे. अशातच राज्यात देखील अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने पावसाची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे. विदर्भात थंडीने जोर पकडला असून, अनेक जिल्ह्यातील किमान सरासरी तापमान 15 अंश सेल्सिअस खाली आले आहे. तर मराठवाड्यात सर्वदूर ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रब्बी पिकांना त्याचा फटका बसत आहे. अशात शेतकऱ्यांना याचा फटका बसू शकतो.
उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. धुळे, जळगाव ,पालघर, ठाणे, नाशिक, नंदुरबार आणि औरंगाबादमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारपासून अवकाळी पाऊस पडत आहे. किनारपट्टी भागामध्ये वेगवान वाऱ्यासह पावसाची रिमझिम सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे.
मराठवाड्यात सर्वदूर ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रब्बी पिकांना त्याचा फटका बसत आहे. बदलत्या हवामानामुळे रब्बी पिकावर विषाणूजन्य रोगाचा प्रभाव होऊ शकतो. प्रतिकूल हवामानामुळे बळीराजा धास्तावला आहे