केळी खत व्‍यवस्‍थापन

 

केळी साठी खालील प्रमाणे खत व्यवस्थापन करावे

केळी साठी सेंद्रीय खते

शेण खत 10 किलो प्रति झााड किंवा गांडूळ खत 5 किलो प्रति झाड

केळी साठी जैवकि खते

औझोस्पिरीलम – 25 ग्रॅम प्रति झाड व पी एस बी 25 ग्रॅम प्रति झाड हे केळी लागवडीच्‍या वेळी करावे

केळी साठी रासायनिक खते

केळीसाठी प्रति झाडाला 200 ग्रॅम नत्र 40 ग्रॅम स्‍फूरद व 200 ग्रॅम पालाश देण्‍याची शिफारस करण्‍यात आलेली आहे. जमिनीतून रासायनिक खते देताना त्‍यांचा कार्यक्षमपणे उपयोग होण्‍यासाठी खोल बांगडी पध्‍दतीने किंव कोली घेवून खते द्यावी.

केळीसाठी जमिनीतून रासायनिक खत देण्‍याचे वेळापत्रक (ग्रॅम प्रति झाड)

अ.क्र. खत मात्रा देण्‍याची वेळ युरिया : सिंगल सुपर फॉस्‍फेट : म्‍युरेट ऑफ पोटॅश

1 लागवडीनंतर 30 दिवसांचे आंत 82 : 250 : 83

2 लागवडीनंतर 75 दिवसांनी 82 : 0 : 0

3 लागवडीनंतर 120 दिवसांनी 82 : 0 : 0

4 लागवडीनंतर 165 दिवसांनी 82 : 0 : 83

5 लागवडीनंतर 210 दिवसांनी 36 : 0 : 0

6 लागवडीनंतर 255 दिवसांनी 36 : 0 : 83

7 लागवडीनंतर 300 दिवसांनी 36 : 0 : 83

एकूण 435 : 250 : 332

(तक्‍यात दिलेल्‍या खत मात्रेत माती परिक्षण अहवालानुसार योग्‍य ते बदल करावे )




 

केळीसाठी ठिबक सिंचनातून खत

केळीसाठी ठिबक सिंचनातून खत देण्‍याचे वेळापत्रक

हजार झाडांसाठी खतांची मात्रा (किलो प्रति आठवडा )

आठवडे युरिया : म्‍युरेट ऑफ पोटॅश

  • 1 ते 16 6.5 : 3
  • 17 ते 28 13 : 8.5
  • 29 ते 40 5.5 ; 7
  • 41 ते 44 0 : 5

स्‍फूरदाची संपूर्ण मात्रा 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्‍फेट व 10 किलो शेणखत केळी लागवडीच्‍या वेळी जमिनीतून द्यावे.

महत्वाचा संदेश :

वरील माहित कृपया तपासून पहा आणि नंतरच तुम्ही तुमचे खत व्यवस्थापन करा, आमची माहिती कदाचित चुकीची सुद्धा असू शकते त्यामुळे वरील माहित कृपया तपासून पहा