पावसाची जोरदार बॅटिंग: पुढील ४ दिवस जोरदार पावसाची शक्यता!

महाराष्ट्रामध्ये मान्सूनच्या पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे. संपूर्ण देशभरात यंदाच्या वर्षी वरुणराजा सगळीकडेच चांगला बरसलेला आहे. देशभरात सरासरीपेक्षा ६ टक्कयांहून जास्त पाऊस यावर्षी आतापर्यंत झालेला आहे. महाराष्ट्रातल्या काही जिल्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे . गेल्या दोन दिवसापासून राज्यातल्या बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे , रत्नागिरी ,नंदुरबार ,नगर बुलढाणा याठिकाणी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्र, पालघर  तसेच कोकणाला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.गेल्या दोन दिवसापासून कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडलेला आहे. मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि कोकण गोव्यातल्या बहुतांश ठिकाणी देखील पावसाने हजेरी लावलेली आहे.

१९ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर पर्यंतचा हवामानाचा अंदाज

१९ सप्टेंबर ते २० सप्टेंबर

१९ सप्टेंबर ते २० सप्टेंबरला बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. विदर्भातल्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे.

२१ सप्टेंबर ते २२ संप्टेंबर

उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून कोकण गोव्यातल्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे IMD ने वर्तवलेली आहे.
मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जना तसेच विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाडा तसेच विदर्भातदेखील मेघगर्जना तसेच विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागणी वर्तवली आहे.

मुसळधार पावसाने नंद्यांच्या पाणी पातळीतदेखील वाढ झाली आहे.मनमाड मधून वाहणाऱ्या पांझण आणि रामगुळणा या नद्यांना महापूर आला आहे त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

सततच्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र काही अंशी वाढवली आहे कारण ढगाळ वातावरणाचा परिणाम हा पिकांवर होऊन शंग अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.