१ ली  ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी  राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना हि सुरु करण्यात आलेली आहे . या योजनेअंतर्गत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबास दीड लाख रुपये रुपये आर्थिक मदत देण्यात येते.

या आधी या योजनेअंतर्गत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबास ७५ हजार रुपये आर्थिक मदत मिळत होती. ती आता वाढवण्यात आलेली आहे.

 

योजनेसाठी लागणाऱ्या नियम आणि कागदपत्रे 

  • विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याची आई हयात नसेल तर वडील किंवा आई-वडील हयात नसल्यास १८ वर्षांवरील भाऊ किंवा अविवाहित बहीण यांच्यापैकी एकाला हे अनुदान दिले जाते.
  • विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख ५० हजार रुपये कुटुंबाला मिळतात त्यासाठी स्थळ पंचनामा,एफआयआरची कॉपी, विद्यार्थ्यांचा सिव्हिल सर्जन यांनी स्वाक्षरी केलेला मृत्यू दाखला द्यावा लागणार.
  • अपघातामुळे कायमचे अपंगत्व , एक डोळा किंवा एक अवयव आल्यास १ लाख रुपये दिले जातात .यासाठी अपंगत्वाच्या करणाबाबतचे डॉक्टरांचे कायमचे अपंगत्व प्रमाणपत्राची पूर्तता करावी लागेल.
  • अपघातामुळे कायमचे अपंगत्व एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास ७५ हजार रुपये दिले जातात.कायमचे अपंगत्व प्रमाणपत्राची पूर्तता करावी लागेल.
  • विद्यार्थाला अपघाती शस्त्रक्रिया करावी लागल्या प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त १ लाख रुपये दिले जातात. यासाठी विद्यार्थ्यांचा सिव्हिल सर्जन यांनी स्वाक्षरी केलेले शस्रक्रिये बाबतचे हॉस्पिटलचे प्रमाणपत्र द्यावे लागते .
  • विद्यार्थांचा आजारी पडून, सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास १.५० लाख दिले जातात यासाठी सिव्हिल सर्जन यांनी स्वाक्षरी केलेले मयत विद्यार्थ्यांचे मृत्यू दाखला द्यावा लागतो.
  • विद्यार्थी कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास जसे कि जड वस्तू पडून ,विजेचा धक्का, आग किंवा वीज अंगावर पडून जखमी झाल्यास .प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किमान १ लाख रुपये दिले जातील. यासाठी हॉस्पिटलचे उपचाराबाबतचे सिव्हिल सर्जन यांनी स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र द्यावे लागेल.

 

या योजनेमध्ये खालील बाबींचा समावेश असणार नाही

नैसर्गिक मृत्यू,अंमली पदार्थांचे सेवन करून झालेला अपघात , मोटार शर्यतीमध्ये झालेला अपघात ,आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न करून जखमी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हि योजना लागू होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *