महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीसाठी राज्यपालांचे निर्देश

सध्या महाराष्ट्र राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडीमध्ये आणखीन एक नवीन ताजी बातमी आज समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी निर्देश दिले आहेत आणि हि बहुमत चाचणी उद्या ३० जुन रोजी घेण्यास सांगितले आहे

आघाडी सरकारमध्ये असलेल्या शिवसेना, राष्टवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना बहुमत चाचणी देण्यासाठी पुरेसे संख्याबळ दाखवावे लागणार आहे परंतु शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरी प्रकरणामुळे शिवसेनेचे ४० आमदार याना सदर आघाडी सरकारमध्ये राहण्यास विरोध दर्शवला आहे त्यामुळे हे सर्व आमदार गुवाहाटीमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत.

 

शिवसेनेने बहुमत चाचणीपासून वाचण्यासाठी सर्वोच न्यायालयामध्ये बहुमत चाचणी विरोधात याचिका टाकलेली आहे.शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू  यांनी हि याचिका दाखल केली आहे. ह्या याचिकेची सुनावणी सध्या चालू असून आज त्याचा निकाल लागणार आहे. जर बहुमत चाचणी झालीच तर आघाडी सरकार हे पेचात सापडणार आहे कारण हि बहुमत चाचणी सिद्ध ना झाल्यास आघाडी सरकार पडणार आहे आणि त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो.

बहुमत चाचणीचा निकाल हा पूर्ण शिंदे गटावर अवलंबून राहणार आहे कारण जर बहुमत चाचणीत शिंदे गट उपस्थित नाही राहिला तर पुरेसे संख्याबळ हे बहुमत चाचणी सिद्ध करण्यास शिवसेना  अडचणीत येणार आहे आणि याउलट जर शिंदे गट उपस्थित राहिला आणि त्यांनी आघाडी सरकारला पाठिंबा न दिल्यास, आघाडी सरकार पडणार आहे.

एकनाथ शिंदे गट उपस्थित असो किंवा नसो या दोन्ही प्रसंगी शिवसेना आणि आघाडी सरकार अडचणीत सापडणार आहे .

एकनाथ शिंदे गटाचा कल भाजपसोबत युती करून सरकार स्थापन करण्याच्या विचारात आहे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे  ह्यांचा पहिल्यापासून विरोध राहिला आहे .

उद्या कोणते सरकार हे पडेल किंवा वाचेल किंवा नवीन सरकार येईल हे उद्याच्या बहुमत चाचणीवरच अवलंबून राहणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *