मुरघास म्हणजे काय?
कुठलाही ओला चारा त्याच्या पक्वतेच्या काळात असताना तोडायचा आणि त्याची कुट्टी करून हवाबंद जागेत साठवून ठेवायचा. ज्यामुळे चाऱ्याचे फर्मेंटेशन होणार नाही आणि हा चारा जास्तीत जास्त काळ टिकून राहतो. मुरघास म्हणजे मुरलेला चारा. प्रथिने, स्टार्च आणि कार्बोहायड्रेट, अन्नद्रव्य हे अशा कुट्टी केलेल्या चाऱ्यात भरपूर प्रमाणात असतात. टंचाईच्या काळामध्ये हा मुरघास आपण दुभत्या जनावरांना देऊ शकतो. असा चारा दुभत्या जनावरांना दिल्यामुळे दूध उत्पादनात वाढ होते. मुरघास हा वेगवेगळ्या पद्धतीने साठवून ठेवता येतो.
मुरघासासाठी कोणती पिके वापरता येतात?
मुरघास बनवण्यासाठी मका, बाजरी, ज्वारी ही पिके वापरली जातात. उसाचे वाढे देखील वापरण्यात येतात .एकदल वैरण किंवा द्विदल वैरण यांचा मुरघास बनवण्यासाठी उपयोग केला जातो. मका, बाजरी, फुलोऱ्यात आलेली ज्वारी यांसारख्या पिकांमध्ये शर्करेचे प्रमाण जास्त असते. तर द्विदल पिकांमध्ये म्हणजे जसे की चवळी, लसूण घास, मूग यांच्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.
वैरण कापल्यावर तीन ते चार तास उन्हात ठेवावी. पाण्याचे प्रमाण 65% पर्यंत असावं हिरव्या चाऱ्यांमध्ये सर्वात जास्त पौष्टिक तत्वे असतात ती हवाबंद जागेत टिकवून ठेवून मुरघास बनवला जातो कुठलाही चारा पीक हे तुमच्याकडे असेल किंवा चिकात असेल ती चाऱ्याची कापणीसाठी योग्य असते.
मुरघासाचे फायदे
मुरघासामध्ये साधारण चाऱ्यावर नैसर्गिक जैविक प्रक्रिया करून गुणवत्ता वाढवली जाते.
जनावरांना पचण्यास हलके असते.
जनावरांना वर्षभर हिरवा चाळा मिळत असल्याने दूध उत्पादनामध्ये दीड ते दोन लिटर पर्यंत वाढ होते. उत्तम दर्जाचे दूध मिळते.
तयार मुरघास लगेचच जनावरांना दिल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ देखील वाचतो.
मुरघास हा कोणत्याही ऋतूमध्ये बनवता येतो .
जनावरांना वर्षभर हिरवा चारा द्यायचा असेल तर मुरघास हा एकमेव पर्याय आहे.
मुरघास बनवण्यासाठी लागणारी साधन सामग्री
हिरवा चारा
कुट्टी यंत्र
बांधकामातला मुरघास
मुरघास साठवणुकीच्या पद्धती
मुरघास बॅग
चाळीस किलो पासून एक टणापर्यंत मुरघास साठवून ठेवण्याच्या बॅग बाजारामध्ये उपलब्ध आहेत. मुरघास बॅगच्या आतून प्लास्टिकचे अस्तर असते. 300 मायक्रॉनच्या असतात जेणेकरून चारा हा हवाबंद राहील. ज्या शेतकऱ्यांना कमी प्रमाणात चारा साठवून ठेवायचा असेल त्यांच्यासाठी मुरघास बॅग या उपयुक्त ठरतात.
मुरघास खड्डा
300 मायक्रोनचे प्लास्टिक अस्तर म्हणून या खड्ड्यांसाठी वापरले जाते. ज्या भागात पाण्याची प्रमाण कमी असेल तेथे ही पद्धत जास्त प्रमाणात अवलंबली जाते. मुरघास बनवण्यासाठी लागणारा खड्डा उंचा वरती असावा ज्यामध्ये पाणी साठले नाही पाहिजे.गुळ, युरिया, मीठ, यासारख्या द्रव्यांचा वापर करावा ज्याने चाऱ्याला बुरशी येणार नाही. मुरघास कल्चर म्हणजे सूक्ष्म जीवाणू आहेत प्रत्येक थरावर याचा वापर करावा. दोन ते तीन सेंटीमीटर लांबीची कुट्टी धरावी खड्ड्यामध्ये एकावर एक थर ठेवून चारा पसरावा. कमी पावसाच्या प्रदेशात जमिनीतला खड्डा करावा बांधकामाच्या भिंती या गुळगुळीत असाव्या जेणेकरून हवा आत येणार नाही. एक फुटाचा थर द्यावा ट्रॅक्टरचा वापर करून थर चोपून घ्यावा कुठल्याही प्रकारची हवा आत राहणार नाही याची काळजी घ्यावी.बेलिंग मशीनच्या सहाय्याने चारा पॅक केल्या जातो. 40 ते 60 दिवसांचा कालावधी हा मुरघास तयार होण्यासाठी लागतो
मुरघास खड्डा बांधकाम
दोन प्रकारचे बांधकाम करता येते बंकर स्वरूपाचे जमिनीत खड्डा करून प्लास्टिक अंथरून आणि दुसरे म्हणजे जमिनीच्या वरचे बांधकाम खड्ड्याचा आकार हा आपल्या जनावरांच्या उपलब्धतेनुसार करावा. नऊ टन मुरघास बनवण्यासाठी 20 फुट लांब, सहा फूट रुंद व पाच फूट उंची असलेल्या खड्डा बनवावा मुरघास हा सगळा पौष्टिक आहार आहे. बुरशी पडलेला मुरघास जनावरांना देऊ नये. मुरघासाचा रंग फिकट हिरवा किंवा तपकिरी असतो. मुरघासाचा सामू चार असावा. लॅक्टिक ऍसिड एक ते दोन टक्के असावे. अशाप्रकारे मुरघास बनवून आपण वर्षभर आपल्या जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करून देऊ शकतात.