अल्प उत्पन्न गटातील मुलींनी शिकावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी व्हावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
नुकतेच राज्य शासनाने एक नवीन योजना लागू केली आहे “लेक लाडकी योजना”
काय आहे लेक लाडकी योजना?
राज्य शासनाच्या लेक लाडकी या योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी कार्ड असणाऱ्या कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
योजनेची स्वरूप
मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये
मुलगी चौथीत असताना चार हजार रुपये दिले जातील.
मुलगी सहावीत असताना सहा हजार रुपये .
मुलगी अकरावीत गेल्यानंतर अठरा हजार रुपये
लाभार्थी मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर रोख 75 हजार रुपये मिळतील
अल्प उत्पन्न गटातील मुलींचा शिक्षणाचा,पालनपोषणाचा खर्च कमी व्हावा यासाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे.
राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी हे एक महत्त्वाचे पाऊल असणार आहे.