पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये मिळतात. शेतकऱ्याला निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र शासनाने ” पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना” सुरु केली आहे.
PM किसान मानधन योजना
भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि इथला शेतकरी राजा हा आनंदी राहावा यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे याच शेतकऱ्यांना म्हातारपणी आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान मानधन योजना (PM kisan Mandhan Pension Scheme) सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 3000 रुपयांपर्यंत निवृत्तीवेतन म्हणजेच पेन्शन मिळणार आहे. या योजनेनुसार ६० वर्षावरील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो .शेतकऱ्यांना उतरत्या वयात आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी हि योजना सरकारने चालू केली आहे .ही योजना म्हणजेच जणू काही आयुष्यभर ऊन पावसात राबनाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याची ‘म्हातारपणाची काठी’ ठरणार आहे.नेहमीच निसर्गाची असलेली अनिश्चितता यामुळे नेहमीच चिंतातुर असणारा बळीराजा काही अंशी का होईना निश्चित्त होणार आहे .
शेळी पालन व्यवसायासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👉👉�� 👉 शेळी पालन व्यवसाय👈👈👈👈
जे शेतकरी पीएम किसान निधी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना पीएम किसान मानधन पेंशन योजनेसाठी कोणतेही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता भासणार नाही.
या योजनेनुसार ६० वर्षे वय असलेला शेतकरी या पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतो .तसेच १८ ते ४० वर्षे वय असलेला शेतकरी या योजनेत गुंतवणूक करू शकतो .या योजनेनुसार शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षानंतर महिन्याला ३००० रुपये म्हणजेच वार्षिक ३६,००० हजार रुपये गारंटेड पेन्शन मिळणार आहे .यासाठी शेतकरी ५५ रुपयापासून ते २०० रुपयांपर्यंत प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करू शकतात या योजनेत फॅमिली पेन्शन ची देखील तरदूत आहे .खातेदाराच्या जर मृत्यू झाला तर त्याच्या पश्चात पत्नीला ५०% पर्यंत पेन्शन मिळू शकेल
PM किसान मानधन पेन्शन स्कीम साठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- ओळख पत्र
- वयाचा दाखला
- शेतीचा सातबारा
- पासबुक
- पासपोर्ट साईझ फोटो
- मोबाईल नंबर
कुक्कुटपालन व्यवसायासाठी सरकारी योजना खालील लिंक वर क्लिक करा
👉👉�� 👉एकात्मिक कुक्कुटपालन योजना👈👈👈👈
PM किसान सन्मान निधी योजना
PM किसान सन्मान योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र असतील त्यांना वर्षाला ६००० रुपये मिळतात .हि रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे जमा होते ३ हफ्त्याकडे हे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंट ला जमा होत असतात . पीएम किसान मानधन पेन्शन योजनेमध्ये नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वार्षिक 6000 रुपयांतून पेन्शन योजनेचं कॉट्रीब्यूशन कपात करण्यात येईल. म्हणजेच शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे खर्च करण्याची गरज राहणार नाही .
PM किसान सन्मान निधी योजना नोंदणी
PM किसान सन्मान निधी योजना साठी नोंदणी करता तुम्ही खालील लिंक वर जाऊन नोंदणी करू शकतात New Farmer Registration Form https://pmkisan.gov.in/RegistrationFormnew.aspx
PM किसान सन्मान निधी योजना स्टेटस
PM किसान सन्मान निधी स्टेटस साठी तुम्ही खालील लिंक वर जाऊन नोंदणी करू शकतात
https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx
PM किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थीची यादी
PM किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थीची यादी तुम्ही खालील लिंक वर जाऊन नोंदणी करू शकतात
https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx
कोणासाठी हि स्कीम नाही आहे
- मंत्री/राज्यमंत्री आणि लोकसभा/राज्य विधानसभा/राज्यसभा/राज्य विधान
- महानगरपालिकांचे माजी आणि विद्यमान महापौर, परिषदांचे माजी/वर्तमान सदस्य, जिल्हा पंचायतींचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष.
- केंद्र/राज्य सरकारची मंत्रालये/कार्यालये/विभाग आणि त्याच्या क्षेत्रीय युनिट्सचे सर्व सेवानिवृत्त
- सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी केंद्रीय किंवा राज्य PSE आणि संलग्न कार्यालये/स्वायत्त
- संस्था सरकार अंतर्गत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियमित कर्मचारी
- मल्टी टास्किंग स्टाफ/वर्ग चौथा
- सर्व सेवानिवृत्त/निवृत्त निवृत्तीवेतनधारक ज्यांचे मासिक पेन्शन रु. 10,000/-किंवा अधिक आहे
- सर्व व्यक्ती ज्यांनी मागील मूल्यांकन वर्षात आयकर भरला आहे
- चार्टर्ड अकाउंटंट, डॉक्टर, अभियंते, वकीलआणि वास्तुविशारद यांसारखे व्यावसायिक.
शेतकरी मित्रानो अजूनही आपण या योजनेत सहभाग नोंदवला नसेल तर लवकरात लवकर या योजनेत सहभागी व्हा .उज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील राहा.
कुक्कुटपालन व्यवसायासाठी सरकारी योजना खालील लिंक वर क्लिक करा
👉👉�� 👉एकात्मिक कुक्कुटपालन योजना👈👈👈👈
खालील माहिती सुद्धा शेतकऱ्यांनी google.com वर शोधली आहे
pradhan mantri kisan samman nidhi official website
pm kisan samman nidhi 2021 list
pradhan mantri kisan samman nidhi status