खेकडा पालन कसे करावे?

मत्स्य व्यवसाय बरोबरच खेकडा पालन हाही व्यवसाय शेतीला जोड धंदा म्हणून करण्यात येत आहे. खेकड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. त्यामुळे खवय्यांची संख्या ही वाढत चालली आहे. परंतु मासे ज्या प्रमाणे मुबलक प्रमाणात मिळतात त्या प्रमाणात खेकडे मिळत नाही. म्हणून याला बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तमिळनाडूमध्ये खेकडा पालन मोठ्या प्रमाणावर होतेखेकड्याच्या दोन जाती आहेत. लाल खेकडा आणि हिरवा खेकडा. हिरव्या जातीचा खेकडा हा दोन ते तीन किलो पर्यंत वाढतो. लाल खेकडा 800 ग्रॅम पर्यंत वाढतो. हिरवा खेकड्याच्या पालनामध्ये बीज उत्पादन झालेली आहे त्यामुळे ही खेकड्याची जात पालनासाठी वापरली जाते. खेकड्यातील नराच्या ओळख कशी करावी तर नराच्या पोटाचा आकार लहान असतो आणि मादीच्या पोटाचा आकार हा मोठा असतो अशाप्रकारे नर आणि मादी यांची ओळख आपल्याला करता येईल

कोण कोणत्या पद्धतीने खेकडा पालन केले जाते ?

खेकडा संवर्धनाच्या बऱ्याच पद्धती आहे तलावातील खेकडा संवर्धन , पिंजरातील खेकडा संवर्धन, बंदिस्त खेकडे पालन व्हर्टिकल क्रॅब फार्मिंग इत्यादी.

खेकडा पालनाचे प्रशिक्षण

रत्नागिरीच्या कृषी विद्यापीठामध्ये खेकडा पालनाचे तीन दिवसीय प्रशिक्षण मिळते. मत्स्य विद्यालय रत्नागिरी येथे प्रशिक्षण तुम्ही घेऊ शकता. योग्य प्रशिक्षण घेऊनच खेकडा पालन व्यवसाय सुरू करावा. जे लोक खेकडा पालन करतात अशा ठिकाणी जाऊन संपूर्ण माहिती सर्वप्रथम जाणून घ्यावी. कुठलाही व्यवसाय सुरू करण्याआधी त्या व्यवसायातली सखोल ज्ञान असायला हवे तरच यश प्राप्त होते.

तुम्ही जर खेकडा पालन करू इच्छित असाल तर त्यासाठी खडकाळ मुरमाड जमीन असेल तरीही चालते तिथे टॅंक बांधावा एक गुंठ्यामध्ये 33 बाय 33 चा टॅंक बांधावा. त्या भिंतींना टाइल्स आणि काँक्रीट करावे जेणेकरून खेकडे त्यांच्या बाहेर जाणार नाही.  माती दीड फुटापर्यंत टाकावी. खेकड्यांना लपता येईल यासाठी पाईपचे तुकडे आणि दगड टाकावे. पाण्यामध्ये छोटे छोटे रोपे लावावे नैसर्गिक वातावरण तयार करावे. सहा फूट खोल टॅंक बनवावा.चार फूट पाणी ठेवावे .तीन ते चार दिवसांनी पाणी बदलावे. हौदामध्ये नैसर्गिक वातावरण तयार करावे त्याच्यामध्ये माती, मुरूम, दगड ,वाळू आणि नैसर्गिक छोटे रोपे लावून वातावरण तयार करावे. खेकड्यांसाठी टॅंक बांधायला साधारणतः पन्नास ते साठ हजार रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो.

बीज कुठे मिळते?

मच्छी मार्केट मधून जून ते ऑगस्ट दरम्यान पिल्ले जास्त प्रमाणावर मिळतात. तिथून तुम्ही ते विकत घेऊ शकतात. एका खेकड्याला चारशे ते पाचशे पिल्ले होते. टॅंक मध्ये त्याच्या लांबी रुंदीनुसार खेकडे टाकावेत. लहान खेकडे मोठी व्हायला दीड वर्ष लागतात.दिवसातून एकदाच खाद्य द्यावे. आठवड्यातून एकदा माशांचे तुकडे टाकावे. खेकड्यांच्या खाद्यावर जास्त खर्च येत नाही तांदूळ भाकरीचे तुकडे हे सुद्धा त्यांना खायला टाकू शकतो. 36 तासानंतर खेकडा ऑक्सिजन घेतो पाण्याच्या बाहेर आल्यावर खेकडा ऑक्सिजन घेतो. मोठे खेकडे हे छोट्या खेकड्याला खात असतात.

वर्टीकल बॉक्स फार्मिंग या पद्धतीने सुद्धा खेकड्याचे संगोपन केले जाते यामध्ये वेगवेगळ्या बॉक्स असतात प्रत्येक बॉक्समध्ये  प्रत्येकी एक असा खेकडा वाढवला जातो. परंतु या पद्धतीने खेकडा पालन करण्यासाठी गुंतवणूक जास्त प्रमाणात करावी लागते.

खेकड्यांची विक्री कोठे करावी?

 हॉटेल चालक, स्थानिक बाजारपेठेत खेकड्यांची विक्री करू शकता. शहरामध्ये याला किंमत जास्त मिळते. खेकड्याचे उत्पन्न हे त्याच्या विक्रीवर अवलंबून असते यात कमी जास्त तफावत होत असते.