शेतकरी मी
बंगालच्या उपसागरामध्ये हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असल्यामुळे कमी हवेचा दाब महाराष्टातून गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने जाणार आहे
गेल्या दोन दिवसापासून सर्वत्र पावसाच्या सरी बरसत आहे. येत्या चार ते पाच दिवसामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दोन दिवसापासून कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली तर काही ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
येत्या चार ते पाच दिवसामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
९ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टीवर काही ठिकाण जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे
मध्य महाराष्ट्र घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विदर्भात ४ ते ५ दिवसात विदर्भात मेघगर्जनेसह आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.