पावसाची जोरदार बॅटिंग: पुढील ४ दिवस जोरदार पावसाची शक्यता!

By:शेतकरी मी 

कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा याठिकाणी गेल्या २ दिवसापासून चांगलाच पाऊस झालेला पाहायला मिळतोय.

२१ ते २२ सप्टेंबर दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता पुणे ने वर्तवली आहे.

महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे नदी नाल्यात पूर आलेला आहे.

आतापर्यंत यावर्षी सरासरीपेक्षा ६% जास्त पाऊस संपूर्ण देशभरात झालेला आहे.

सतत पडणाऱ्या पावसामुळे मनमाड मधून वाहणाऱ्या  रामगुळणा आणि पांझन या नद्यांना पूर आल्यामुळे तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. 

Thank You!