डेअरी फार्म मध्ये नुकसान होण्याची कारणे

शेतकरी मी

जास्त किमतीत गाई खरीदी आपण करतो आणि तीच गाई भाकड झाल्यावर तीच गाई अर्ध्या किमतीत पण कोणी घेत नाही, त्यामुळे घेतानाच कमी किमतीत गाई घ्यावी.

गाईची निवड चुकीची करणे, डेअरी फार्म साठी एका वेळेस गाई ने ९ ते १० लिटर दूध दिले तरच डेअरी फार्म फायदेशीर ठरते पण गाई ने फक्त ५ ते ७ लिटर दूध दिले तर डेअरी फार्म नुकसानीत जाते.

जर गाईची उत्तम काळजी घेतली नाही तर २० लिटर दूध देणारी गाई हि २ ते ३ लिटर वर येते त्यामुळे पण डेअरी फार्म मध्ये नुकसान होते 

गाई ला चार पाणी दिल्यावर त्यांना एकांत पण न दिल्यास  त्यांची रावांच्या क्रिया होत नाही आणि दूध उत्पादन कमी होते.

तुम्ही गाई ला दिवसाला ७ ते ८ किलोचा चा ढेप खाण्यासाठी देत असाल तर गाईच्या उत्पन्नाचा विचार करून तिला ढेप देणे खरंच परवडते का ते पहा 

जर तुम्ही स्वतः डेअरी फार्मची निगराणी करत नसाल आणि तुम्ही डेअरी फार्म दुसऱ्यांच्या विश्वासावर असेल तर हे एक डेअरी फार्मच्या नुकसानीचे मुख्य कारण आहे

Thanks