राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना

शेतकरी मी

१ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना हि सुरु करण्यात आलेली आहे

या योजनेअंतर्गत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबास दीड लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येते.

विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याची आई हयात नसेल तर वडील किंवा आई-वडील हयात नसल्यास १८ वर्षांवरील भाऊ किंवा अविवाहित बहीण यांच्यापैकी एकाला हे अनुदान दिले जाते.

विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख ५० हजार रुपये कुटुंबाला मिळतात त्यासाठी स्थळ पंचनामा,एफआयआरची कॉपी, विद्यार्थ्यांचा सिव्हिल सर्जन यांनी स्वाक्षरी केलेला मृत्यू दाखला द्यावा लागेल.

 अपघातामुळे कायमचे अपंगत्व, एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपये दिले जातात.

नैसर्गिक मृत्यू,अंमली पदार्थांचे सेवन करून झालेला अपघात , मोटार शर्यतीमध्ये झालेला अपघात ,आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न करून जखमी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हि योजना लागू होत नाही.

Thank you