जगात सर्वात मोठे काम म्हणजे कोणाला तरी खायला घालणे, , यापेक्षा मोठे काम आपल्या शेतकऱ्याचे आहे ते म्हणजे खाण्यासाठी पीक वाढवणे , पण आपण त्या शेतकऱ्याला खरच मान देतो का?
मी मॅनेजर आहे, मी अभियंता आहे, मी बँकर आहे, मी कलेक्टर आहे, मी अकाउंटंट आहे, असे सर्व लोक अभिमानाने सांगतात, पण मी शेतकरी आहे हे आपण अभिमानाने का म्हणू शकत नाही
अनेकांना आपल्या मुलीचे लग्न शेतकऱ्याशी करायचे नसते जणू शेतकरी बनणे हे जगातील सर्वात वाईट काम आहे का असे त्यांना वाटते का?
आज असे अनेक शेतकरी आहेत ज्यांना आपल्या मुलांनी शेतकरी व्हावे असे वाटत नाही, ते सगळे शहराकडे धाव घेत आहेत.
असेच चालू राहिले तर येत्या १५-३० वर्षात शेती करायला कोणीच उरणार नाही, म्हणजे शेतकरी नावाच संपेल
जर शेतकरी नामशेष झाला तर सर्व उपाशी राहतील अन्नधान्य हि एकमेव अशी गोष्ट आहे जी कोणत्याही मशीन ने तयार होत नाही
जर शेतकऱ्यांनी फक्त स्वतःपुरतेच उगवले आणि त्यांनी धान्य विकलेच नाही तर हेच अभियंते, बँकर, कलेक्टर, अकॉउंटन्ट हे सारे हाय फाय म्हणणारे हे स्वतः शेतकरी बनतील
एखादा माणूस नोकरी सोडून शेती करायला आला की सगळे लोक त्याला टोमणे मारायला येतात आणि त्याला वेडा समजतात, शेतकरी बांधवच त्याला वेडा समजतात
तुम्हाला ही पोस्ट कडू पण खरी वाटली तर नक्की शेअर करा.
आणि
अभिमानाने सांगा मी शेतकरी आहे