मान्सूनची वाटचाल थांबली शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता

शेतकरी मी

मान्सून थांबला

हवामान विभागाने जुनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून कोकण किनारपट्टीवर येण्याचा अंदाज वर्तविला होता. परंतु अजूनही कर्नाटकच्या किनारपट्टीवर मान्सून थांबला आहे 

मान्सूनची बातमी

कर्नाटकच्या किनारपट्टीवर मान्सून सध्या थांबला असून. मान्सून ला योग्य हवामानाची साथ न मिळाल्यामुळे काही दिवस मान्सूनची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे    

पाऊसाची आतुरतेने वाट 

शेतीच्या कामाला पावसाच्या आगमनाचा मुहूर्त महत्वाचा असतो त्यामुळे अनेक शेतकरी आता पावसाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे

पूर्व मोसमी पाऊस 

हवामान विभागातर्फे मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात विशेषतः सातारा, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद कोल्हापूर, आणि लातूर जिल्ह्यात पूर्व मोसमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

कृषी विभागामार्फत आवाहन

शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे कि पेरणीची घाई करू नका  जोरदार पाऊसाची प्रतीक्षा  करा

Skymet अंदाज 

Skymet नुसार यावर्षी देशात 907 मिलीमीटर पाऊसचा अंदाज वर्तवला आहे आणि यंदा सामान्य किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस होईल.

मान्सून कोठे अडकला 

सध्या मान्सून हा 2 आठवड्यापासून बाडमेर, भिलवाडा, अलिगड, मेरठ, धौलपुर, अमृतसर आणि अंबाला येथेच अडकला आहे 

Thanks