येणारे पाच दिवस हे महाराष्ट्रासाठी मुसळधार पावसाचे !

शेतकरी मी

अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात ५ ते ९ जुलै दरम्यान  मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे.

विजांच्या कडकडाटासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.

मुंबई शहरासह पश्चिम आणि पूर्व उपनगरात चांगला पाऊस पडत आहे. ठाणे आणि मुंबई साठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे

कोकण आणि पालघर मध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.

धन्यवाद !