महाराष्ट्रात होळीचे महत्व

होळीची पौराणिक कथा

होळी

महाराष्ट्रातच नाहीतर पूर्ण भारतात हा सन आनंदाने साजरा करतात, ह्या दिवशी घरासमोर शेणाच्या गवऱ्या आणि लाकूड व त्यावर तूप टाकून अग्नी दिली जाते  

होळीचे महत्व

असे म्हणतात कि होळीच्या आगीबरोबर वाईट विचार आणि वाईट गोष्टी पण ह्या जाळून जातात आणि नवीन विचारांची आग मनात येऊन धूप रुपी आत्मविस्वास वाढत असतो  

होळी आणि धूलिवंदन

खूप जणांचा हा गैरसमज आहे कि होळी म्हणजे त्या दिवशी रंग खेळणे होय पण तसे नाही, धूलिवंदन च्या दिवशी रंग खेळत असतात   

होळी विषयी पौराणिक कथा

एक हिरण्यकश्यपू जुलमी नावाचा राजा होता . तो देवतांचा तिरस्कार करायचा त्याला भगवान विष्णू चे नाव ऐकणे हि पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता

पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपू ला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे

ह्या सगळ्याला कंटाळून राजाने आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि आगीत कधी जळणार नाही राजाने होलिकेला भक्त प्रह्लाद ला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले

प्रह्लाद आपल्या आत्या सोबत अग्नीच्या चितेवर बसला आणि राजाने आग लावून दिली पण प्रह्लाद भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला प्रह्लाद आणि थोड्याच वेळात होलिका जाळून जाते परंतु प्रह्लाद काही होत नाही

अश्या प्रकारे भक्त प्रल्हाद च्या भक्तीमुळे लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखू लागले आणि दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले.

धन्यवाद