अंजीर लागवड आणि व्यवस्थापन

By: शेतकरी मी 

अंजीर हे कमी पाण्यावर येणारे औषधी फळझाड आहे. कमी खर्च आणि जास्त नफा यामुळे बरेचशे शेतकरी आता पारंपरिक पिकाला फाटा देऊन अंजीर शेती कडे वळले आहेत .

महाराष्ट्रामध्ये ४१७ हेक्टर क्षेत्र हे अंजीर लागवडीखाली आहेत तर यापैकी ३१५ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र हे एकट्या पुणे जिल्ह्यात आहे.

अंजिरामध्ये क, अ जीवनसत्वे तसेच लोह,पोटॅशियम, मॅग्नेशिअम यासारखे घटक असतात त्यामुळे ह्या आरोग्यवर्धक फळाला जास्त मागणी आहे.

अंजीर लागवडीसाठी उष्ण व कोरड्या हवामानाची आवश्यकता असते. महाराष्ट्रामध्ये असे हवामान असल्यामुळे अंजीर लागवडीसाठी चांगला वाव आहे.

अंजीर लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या कसदार जमिनीची गरज असते. अंजीर हे फळझाड हलक्या जमिनीतही चांगले बहरते

महाराष्ट्रामध्ये मुख्यतः ऍड्रिऍटिक किंवा कॉमन हि जात लावली जाते. हि जात पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लावली जाते. पूना अंजीर या नावाने हि जात सुप्रसिद्ध आहे.

व्‍हाईट सान पेट्रो,सिमरना, काबूल, कालिमिरना, कडोटा, मार्सेल्‍स ,दिनकर आदी अंजिराच्या जाती लागवडीसाठी प्रसिध्‍द आहेत.

अंजिराची लागवड हि पावसाळ्यामध्ये म्हणजेच जून ते ऑगस्ट दरम्यान करावी.अंजिराची लागवड हि पावसाळ्यामध्ये म्हणजेच जून ते ऑगस्ट दरम्यान करावी.

अंजीर बागेला वर्षातून दोनदा फळांचा बहार येतो.पावसाळ्यात येणाऱ्या म्हणजेच जुलै ऑगस्ट मध्ये येणाऱ्या बहराला खट्टा बहार म्हणतात त्याची फळे हि बेचव असतात ज्याचा उपयोग जेली बनवण्यासाठी करता येतो.

फळांचा मिठा बहार हा मार्च एप्रिल मध्ये येतो जो खूप गोड असतो. फळांचा दर्जा चांगला असल्यामुळे बाजारभाव देखील चांगला मिळतो.

झाडांची योग्य ती काळजी घेतल्यास एका झाडापासून25 ते 40 किलो फळे मिळतात.

Thank You