शेतकरी मी
दोन आठवड्या पासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पाऊस पडलेला नाही
पीक चांगल्या अवस्थेत असताना पाऊस नसल्यामुळे पाण्याचा ताण हा या पिकांवर येत आहे
अनेक शेतकरयांचे डोळे हे आभाळाकडे टिपून असून पाऊसाची ते वाट पाहत आहे
जून च्या शेवटी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी चांगल्या पाऊसाची सुरुवात झाली होती
जुलै च्या संपूर्ण महिन्यात आणि आगस्ट च्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात खूप ठिकाणी चांगला पाऊस झाला
महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला असून जुलै मध्ये बऱ्याच ठिकाणी अतिपाउसामुळे बरीच पीक हे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले होते
शेतकऱ्यांना या वेळेस पाऊस पडण्याची नितांत गरज असताना पाऊसाने खंड दिल्याने शेतकरी चिंतेत आहे