एकनाथ शिंदे यांचे पूर्ण नाव एकनाथ संभाजी शिंदे असे आहे.शिंदे हे शिवसेना नेते असून महाराष्ट्राचे नवीन २०वे मुख्यमंत्री आहेत .
नुकताच ३० जून २०२२ ला त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला या आधी ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते.
९ फेब्रुवारी १९६४ हा त्यांचा जन्मदिवस आहे.
एकनाथ शिंदे हे मूळचे साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे या गावचे आहेत
लता एकनाथ शिंदे ह्या त्यांच्या पत्नी आहेत तर श्रीकांत एकनाथ शिंदे हे त्यांचे सुपुत्र आहे.
इयत्ता १० वी पर्यंत शिकल्यानंतर गरिबीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते.वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांनी मराठी आणि राजकारण या विषयात बी.ए केलेले आहे.
१९९७ मध्ये त्यांना आनंद दिघे यांनी ठाणे महापालिकेचे तिकीट दिले त्यात त्यांचा घवघवीत विजय झाला होता.
शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात ८ दिवस बंड पुकारले असल्याने ते चांगलेच चर्चेत आले होते.
शिंदे यांच्यासोबत ५० आमदार असल्याने त्यात ३९ आमदार हे शिवसेनेचे होते ठाकरे सरकार अल्पमतात आल्यामुळे उद्धव ठाकरे याना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.
साधा रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास आहे.