शेतकरी मी
एकनाथ शिंदे यांचा गट ४० पेक्षा जास्त आमदारांसह गोव्यात जाणार आहे .
ताज कन्व्हेन्शन हॉटेलमध्ये आमदारांसाठी 71 खोल्या बुक करण्यात आलेल्या आहेत. येथूनच हे आमदार बहुमत चाचणीसाठी मुंबईत दाखल होणार
एकनाथ शिंदेंच्या गटाने आज गुवाहाटीतील कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे. दुपारी ३ नंतर ते गुवाहाटी सोडणार आहेत. यानंतर ते गोव्याला जाण्यासाठी रवाना होणार आहेत.
महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या पक्षांना बहुमत चाचणी देण्यासाठी पुरेसे संख्याबळ दाखवावे लागणार आहे
एकनाथ शिंदे यांनी आसामच्या पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांतर्फे आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाखांची मदत जाहीर केली आहे.
उद्या सकाळी म्हणजेच 30 जून रोजी सकाळी ११ वाजता फ्लोअर टेस्टसाठी विशेष अधिवेशन होणार आहे