पुराच्या पाण्यात बैल गेला वाहून!

शेतकरी मी

गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे त्यामुळे अनेक नद्यांची पाणीपातळी वाढली आहे.

सध्या खरिपाची लागवड चालू आहे त्यामुळे शेतकरी हा शेताकडे जात आहे .जोरदार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर येतोय

अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ गावालगत असलेल्या धामना नदीला पूर आला होता .नदीला पूर आलेला असताना देखील येथील शेतकरी रईस खान शब्बीर खान यांनी नदीचा पूल ओलांडण्यासाठी बैलगाडी  पाण्यात घातली.

नदीवरील पाणी बघून गावकऱ्यांनी त्यांना पाण्यात न उतरण्याचा सल्ला दिला होता परंतु त्याने गावकऱ्यांचे ऐकले नाहि

बैलगाडी सोबतच रईस हा शेतकरी देखील वाहून जाऊ लागला . हे लक्षात येताच आसपासच्या लोकांनी प्रसंगावधान राखून नदीकडे धाव घेतली आणि शर्थीचे प्रयत्न करून शेतकऱ्याचा जीव वाचवला.

परंतु एक निष्पाप मुका जीव या बैलगाडीसोबतच पुराच्या पाण्यात वाहून गेला तर दुसरा बैल हा पाण्यातून बाहेर आला.

आणखी काही दिवस पावसाचा जोर राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी नको ते धाडस करू नये असा सल्ला लोकप्रतिनिधींकडून दिला जात आहे

धन्यवाद!