केळी लागवड कशी करावी 

By: ShetkariMi.Com

जमिनीची निवड 

केळीच्या लागवडीसाठी 6 ते 7.5 सामू असलेली भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होणारी हलक्‍या ते मध्यम प्रतीची जमीन लागते

केली लागवडच्या पद्धती

केळी लागवड करण्याच्या साधारणतः दोन पद्धती आहे एक म्हणजे कंद आणि दुसरी उतिसवंर्धित रोपांपासून लागवड केली जाते

केळी लागवडीचे अंतर

केळी लागवडीचे अंतर हे केळीच्या वाणानुसार ठरवावे लागते केळीची लागवड साधारणतः 5 फूट ते ६ फूट अंतरावर करावी लागते 

कंदाची निवड

केळीच्या कंदाची निवड करताना कंद हा निरोगी घेरदार बुंध्याच्या  आणि घडावर 7 ते 10 फण्या असलेल्या मातृवृक्षापासून निवडावा.  400 ते ७०० ग्रॅम वजन असलेले कंद लागवडीसाठी निवडून घ्यावेत.

केली लागवडीचा हंगाम

केली लागवड हि उन्हाळा सोडून कधीही लागवड करता येते. जून जुलै मध्‍ये लागवड केल्यास त्या बागेस मृगबाग असे म्‍हणतात तर सप्‍टेबर ते जानेवारी मध्ये होणा-या लागवडीस कांदेबाग म्‍हणतात 

केळीसाठी पाणी व्यवस्थापन

केळीच्या झाडांना खूप मोठ्या प्रमाणात पाणी लागते, जमिनीचा पोत, हवामान आणि झाडांची उंची पाहून पाण्याचे व्यवस्थापन करावे आणि झाडाच्या खोडाजव पाणी राहणार नाही याची काळजी घ्यावी