आताच काही दिवसापूर्वी हवामान खात्याने जाहीर केले होते कि कोकण, मध्य महाराष्ट्र ओलांडून मान्सून मराठवाड्यापर्यंत पोहोचला आहे आणि मान्सून च्या पाऊसाची सुरवात होणार आहे. पण घडले त्याच्या उलटेच पावसाचं प्रमाण मात्र कमी झाले आहे उन्हाच्या चटका पुन्हा जाणवू लागला आहे
मान्सून पूर्व पाऊसाने २ ते ३ दिवस चांगला पाऊस पडला असे वाटले कि आता या वेळी मान्सून चा पाऊस लवकर येऊन या मातीची तहान भागवेल परंतु तसे काही झाले नाही
अर्धा जून संपला तरीही मान्सून चा पाऊस काही हवा तसा महाराष्ट्रात पडला नाही, सरकारनी सूचना देऊन सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी ची घाई केली त्यांना वाटले पहिला पाऊस चांगला पडला परंतु आता पाऊसात खंड पडल्यामुळे ते आता चिंताग्रस्त झाले आहे, त्यांना असा पस्तावा झाला कि आपण खरंच सरकारी सूचनांचे पालन केले असते तर पेरणी वाया जाण्याची वेळ नसती आली
आता सर्व शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे, शेतकरी हे पावसाकडे डोळे लावून वाट पाहत आहे