शेतकऱ्यांनो सावधान बाजारामध्ये आता बनावट खत औषधांबरोबरच बनावट कीटकनाशके विकणाऱ्यांचा देखील सुळसुळाट झाला आहे. खरिपासाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत-औषधे त्याबरोबरच कीटकनाशके यांची खरेदी करावी लागत असते आधीच शेतीतून मिळणारे तुटपुंजे उत्पादन आणि खत बियाणे यांच्या मधून होणारी फसवणूक यातून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते. ग्रामीण भागामध्ये हे अशा प्रकारचे प्रमाण फार वाढले आहे
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात बनावट कीटकनाशके आणि खतांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. दोन आरोपीं ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्याकडून सात लाख 26 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बनावट बी बियाणे आणि खत औषधांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये व त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी यवतमाळ जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर कृषी विभागाने भरारी पथकाची नेमणूक केली होती पांढरकवडा तालुक्यातून बनावट खत औषधे विक्री संबंधी तक्रार दाखल झाली होती त्यानंतर कृषी विभागाने नेमलेल्या भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी चौकशी करण्यास सुरुवात केली
याबाबत चौकशी केल्यानंतर दिनेश कुंडलकर आणि जावेद अंसारी हे दोघे बोगस किटकनाशकांची विक्री करत असल्याचे आढळून आले. हे दोघे तेलंगणा गुजरात या राज्यांमधून अडीच लिटर च्या डब्यांमध्ये बोगस कीटकनाशकांची खरेदी करत होते.
शेतकऱ्या यांनी खत खरेदी करत असताना कृषी सेवा केंद्रांची नोंदणी क्रमांक असलेले पक्की पावती व बिल घेणे आवश्यक आहे असे केल्याने तुमची फसवणूक टाळता येण्यासारखी आहे