सोलर कृषी पंप योजना महाराष्ट्र Solar Pump Scheme Maharashtra

केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत मध्ये प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना जाहीर करण्यात आली आहे आणि ह्या प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत 100000 सौर पंप वाटप योजना सुरु झाली आहे. यासाठी केंद्र शासनाकडून अद्याप पुरवठादार कंपन्या व दर अंतिम झाले सौर कृषीपंप योजना राबविण्यासंदर्भात निर्णय घेतला होता ह्या योजने अंतर्गत राज्य शासनाने 1 लाख पारेषण विरहीत सौर कृषी पंप वाटण्यासाठी 3 वर्षांच्या कालावधी मध्ये ३ टप्यात त्याचे वितरण करणार आहे त्याचे टप्पे खालील प्रमाणे.

पहिल्या वर्षी – १००००० नग

उर्वरित वर्षी – ४००००० नग




 

Kusum Solar Pump Scheme

या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 HP , 5 HP व 7.5 HP क्षमतेच्या सोलर कृषी पंपांसाठी अर्ज करता येतील.

कुसुम सोलर पंप योजना कोण घेऊ शकतो

ही योजना केवळ ज्या ठिकाणी वीज जोडणी शेतापर्यंत पोहोचलेली नाही तेच शेतकरी हि योजना घेऊ शकतात आहे.

अनुदान

खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होतील.

कुसुम सोलर पंप योजनेची नोंदणी

कुसुम सोलर पंप योजनेसाठी रजिस्टर करण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. आणि जो प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य देण्याच्या तत्त्वावर सौर कृषीपंपाचा लाभ देण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे

सौर कृषी पंपाचे फायदे

  • दिवसा विनाव्यतय अखंडित वीज पुरवठा
  • डिझेल पंपाच्या तुलनेमध्ये खर्च हा शून्य आहे.
  • वीज बिलापासून मुक्तता आणि खर्चात बचत
  • दिवसा शेतीपंपास सूर्यापासून वीजेची उपलब्धता
  • रात्री झाडांना पाणी देण्याचे वेळ येणार नाही
  • सोलर पंपने विजेची बचत होईल आणि पर्यावरण पूरक सानिध्यात वीज निर्मिती होते
  • औद्योगिक व घरगुती वीज ग्राहकांवरील सबसिडीचा बोजा कमी होईल.
  • शेतकऱ्यांना या योजने साठी अनुदान भेटणार असून अगदी कमी खर्चात त्यांना हा पंप भेटणार आहे

अर्जाची प्रक्रिया

  • https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B ऑनलाइन अर्ज करावा
  • सध्याच्या कृषीपंपाकरिता नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करुन प्रलंबित असलेल्या अर्जदाराने फक्त काही अनिवार्य फील्ड, उदा. अर्ज क्रमांक, पैसे भरल्याची पावती क्रमांक, मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी इ. तपशील देणे अनिवार्य आहे.




 

PM Kusum Yojana Documents

  • फॉर्मवर संपूर्ण माहिती भरावीे सोबत (कागदपत्रांची प्रत अपलोड करावी)
  • 7/12 उतारा प्रत लागेल
  • आधार कार्ड लागेल
  • कास्ट प्रमाणपत्र (एससी / एसटी लाभार्थींसाठी) लागेल
  • ७/१२ उतारा (विहिर | कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. २००/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.
  • बँक पासबुक प्रत.
  • शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र

प्रत्येक टप्प्यावर अर्जदारांना एसएमएसद्वारे कळविण्यात येते.

सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021

मुख्यमंत्री सोलर पंप योजना मप ऑनलाइन महाराष्ट्र

मुख्यमंत्री सोलर पंप योजना महाराष्ट्र 2020

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अर्ज 2021


ऑनलाइन सोलर पंप रजिस्ट्रेशन

ऑनलाइन सोलर पंप रजिस्ट्रेशन Maharashtra

सौर पंप योजना महाराष्ट्र PDF

अटल सौर कृषी पंप योजना अर्ज