Custard Apple Farming सिताफळ हे महत्वाचे फळपिक असून त्याची लागवड प्रामुख्याने दुष्काळ ग्रस्त भागात आणि हलक्या जमिनीमध्ये केली जाते. सीताफळ विशेषतः कोरडवाहू भागामध्ये, पडिक आणि हलक्या जमिनीत मोठया प्रमाणात लावली जाती कारण सीताफळाला अशीच जमीन मानवते . सिताफळ हे कुठे हि येणार फळ झाड आहे ते जंगल, द-या खो-यातहि झाडांची वाढ होते आणि सीताफळ हे कोरडवाहू फळझाड असून गरीबांचा रानमेवा म्हणून ओळखले जाते.
- सिताफळ लागवडीचे मुख्य ठिकाण
- सिताफळ लागवड
- सिताफळाचे उपयोग
- सिताफळ लागवडीसाठी जमीन
- सिताफळ लागवडीसाठी हवामान
- सिताफळाच्या जाती
- सिताफळासाठी पाणी व्यवस्थापण
- सिताफळासाठी खत व्यवस्थापण
- सिताफळाच्या झाडांची काळजी
- सिताफळाच्या झाडामध्ये कोणती आंतरपिके घ्यावी
- सिताफळाच्या झाडांचा बहार धरणे
- सिताफळ लागवडीचा फायदा
सिताफळ लागवडीचे मुख्य ठिकाण
सिताफळाची लागवड प्रामुख्याने कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश , तामिळनाडू, महाराष्ट्रव बिहार राज्यात केली जाते. महाराष्ट्रामध्ये बीड, जळगांव, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, परभणी, अहमदनगर, सातारा व भंडारा या जिल्हयात सिताफळाची झाडे मोठया प्रमाणावर दिसतात. दौलताबाद ची सिताफळे फारच स्वादिष्ट लागतात असा खूप मोठा प्रचार झालेला आहे आणि या ठिकाणी डोंगराळ भाग जास्त असून या झाडांचे प्रमाण हि खूप आहे. मराठवाडयातील धारुर आणि बालाघाट ही गावे सिताफळासाठी प्रसिध्द आहेत.
विदर्भा मध्ये पवनी, गोंदिया, वाशिम,भंडारा , माहूर, तर सातारा जिल्हयात कवठे, वाल्हे, जवेळे, आणि खंडाळा फलटण तालुक्यातील काही ठराविक भाग सिताफळाकरिता यशस्वी लागवड झाली आहे
सिताफळ लागवडीचा फायदा
सिताफळाची पाने शेळयामेंढया, जनावरे किंवा इतर कोणताही प्राणी खात नाही म्हणून कोणत्याही प्रकारचे संरक्षण न करताही या फळझाडाची जोपासना सहज करता येते. बागेमध्ये कुंपणाच्या बाजूने या फळझाडाची लागवड करणे फायदेशिर ठरते, सिताफळ हेक्टरी अतिशय काटक फळझाड असून त्याला पाणी कमी लागते आणि याचप्रमाणे बरड जमिन ओलाव्याची जागा, नदीकाठ तसेस शेताचे बांध, डोंगर उताराच्या जमिनी, माळराने अशा वेगवेगळया प्रकारच्या जमिनीमध्ये या पिकाची लागवड करता येते आणि लागवडीचा खर्च पण कमी आहे
सिताफळाचे उपयोग
सीताफळ ला रानमेवा मानून पण ओळखतात, सिताफळाचा गर गोड असतो, सिताफळाचा गर दुधात मिसळून त्याचे सरबत किंवा जूस पण करतात, सिताफळ अत्यंत मधूर फळ असून आयुर्वेद गन संपन्न आहे
सिताफळ लागवडीसाठी जमीन
सिताफळ विशेषतः कोरडवाहू भागामध्ये, पडिक आणि हलक्या जमिनीत मोठया प्रमाणात लावली जाती कारण सीताफळाला अशीच जमीन मानवते . सिताफळ हे कुठे हि येणार फळ झाड आहे ते जंगल, द-या खो-यातहि झाडांची वाढ होते
सिताफळ लागवडीसाठी हवामान
सिताफळ हे उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशापासून माध्यम ते भारी पाऊसपडणाऱ्या हवामानाच्या भागात सिताफळ वाढते, सीताफळाला कडक थंडी आणि धुके हे मानवत नाही. आणि जास्त थंड हवामानामध्ये फळे पिकत नाहीत. मोहोराच्या काळात कोरडी हवा आवश्यक असते
सिताफळाच्या जाती
बाळानगर, मॅमॉथ, धारूर ३, पिंक बुलक्स हाई, वॉशिंग्टन ९८७८, 6 ऑयलॅड जेम्स
सिताफळाची लागवड
सिताफळाच्या लागवडीसाठी पावसाळयापूर्वी मे महिन्यात करतात, झाडांसाठी 0.60 बाय 0.60 बाय 0.60 मीटर आकाराचे खडडे घ्यावेत. आणि अंतर हे 5 बाय 5 मिटर अंतरावर खडडे घ्यावेत. 5 बाय 5 मिटर अंतरावर लागवड केल्यास एकरी सादारन पाने 160 झाडे बसतात. खडडे हो शक्यतो पावसाळयापूर्वी ग्यावी आणि त्यामध्ये शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे.
सिताफळासाठी पाणी व्यवस्थापण
सिताफळाच्या झाडांना कमी पाण्याची आवश्यकता असते, सीताफळ लागवडीनंतर पहिल्या 3 ते 4 वर्ष्यात उन्हाळयात पाणी दिल्यास झाडांची वाढ हि चांगली होते आणि फळ धारणा लवकर होते. फळधारणेनंतर सप्टेबर ते ऑक्टोबर महिन्यात पाण्याच्या 1 ते 2 पाळया दिल्यास भरपूर व मोठी फळे मिळण्यास फायदा होतो.
सिताफळासाठी खत व्यवस्थापण
- पहिल्या वर्षी प्रत्येक झाडांना ग्रॅम मध्ये 125:125:125 (नत्र:स्फूरद :पालाश) द्यावा
- दुसऱ्या वर्षी प्रत्येक झाडांना ग्रॅम मध्ये 250:250:250 (नत्र:स्फूरद :पालाश) द्यावा
- तिसऱ्या वर्षी प्रत्येक झाडांना ग्रॅम मध्ये 375:250:250 (नत्र:स्फूरद :पालाश) द्यावा
- 4 ते 5 वर्षापुढील प्रत्येक झाडालाशेणखत किंवा कंपोस्ट खत आणि 200 ते 500 ग्रॅम युरिया द्यावा.
सिताफळाच्या झाडांची काळजी
खुरपणी करणे आणि बागेतील तण काढावेत
रोपे मेली असतील तर नवीन रोपे लावावे
झाडे मोठे झाल्यावर ताण पडल्यास 15 ते 20 दिवसांनी पाणी द्यावे
रोपे लहान असताना पावसाचा ताण पडल्यास मधून मधून पाणी द्यावे
झाडांची छाटणी करावी
वेळोवेळी आंतर मशागत करावी
सिताफळाच्या झाडामध्ये कोणती आंतरपिके घ्यावी
भुईमूग, सोयाबीन, घेवडा, कलिंगड, चवळी, हरभरा इत्यादी पिके आंतरपिके म्हणून घेता येतात
सिताफळाच्या झाडांचा बहार धरणे
ताण देण्यापूर्वीच फूले, वाळलेली फळे झाडावर असल्यास ती काढून टाकावीत. त्यानंतर बागेचे पाणी हळूहळू कमी करत जाऊन नंतर बंद करावे. झाडांची 30 ते 50 टक्के पानगळ झाल्यानंतर झाडांना ताण मिळाली असे समजावे.