राज्यात डिसेंबर 2021 पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती त्यानंतर पुन्हा 28 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान काहि ठिकाणी तुरळक पाऊस पडला होता परंतु आता राज्यात पुंन्हा एकदा हवामानात बदल पाहण्यास मिळत आहे कारण काहीठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाने बारसण्यास सुरवात केली आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे गहू, हरभरा, तूर या पिकांसह शेवट उरणीच्या कापसाला याचा फटका बसला त्याच बरोबर संत्रा, मोसंबी आणि भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले असुन काल महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत पाऊस झाला तर काही ठिकाणी गारा पडल्या आहेत.
महाराष्ट्र वर कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे त्यामुळे उत्तरेतील थंड वारे आणि समुद्रावरून येणारे बाष्प उक्त वारे यामुळे किमान तापमानात वाढ झाली असून ढगाळ वातावरण तयार झाले आहे
पुढील ३ ते ४ दिवस राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर काही ठिकाणी गारपिटीची होण्याची पण शक्यता हि हवामान खात्याकडून दिली आहे. हवामान खात्याच्या सूचनेनुसार पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस तर काही वेळेनंतर पुन्ना थंडी सारखे वातावरण राहणार आहे आज राज्यात बहुतांशी ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद झाली असून पुढील काही तासांत अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
त्याच प्रमाणे भंडारा व गोंदिया जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती आणि . गोंदियात १५ ते २० मिनिटे झालेल्या जोरदार अवकाळी पौड झाला होता आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले तसेस शहरातील रस्त्यांवर काही ठिकाणी पाणी साचले होते. या अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका हा रब्बी पिकांना आणि भाजीपाल्याला बसणार आहे आहे. त्याच प्रमाणे खरीप हुंगामाच्या पिकाची काढणी सुरु आहे त्यामुळे काडणीत आलेल्या पिकांचे सुद्धा नुकसान होण्याची शक्यता आहे