मोसंबी लागवड सोयीची व कमी खर्चाची असून, मराठवाड्यातील हवामान मोसंबीसाठी योग्य आहे, मराठवाड्यात मोसंबीची लागवड मोठ्या प्रमाणात होते, मोसंबी लागवडीचे मुख्य फायदे म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे हे एक फळ पीक आहे(Mosambi Cultivation)
आज आपण मोसंबी फळ बाग लागवड करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या खालील बाबीची माहिती आम्ही तुम्हाला सविस्तर देणार आहोत
- मोसंबी साठी जमिनीची निवड
- मोसंबीची लागवड़ कशी करावी
- मोसंबी साठी हवामान
- मोसंबीच्या जाती
- मोसंबीच्या कलमांची निवड
- मोसंबी साठी पाणी व्यवस्थापन
- मोसंबी खत पाणी व्यवस्थापन
- मोसंबी साठी जमिनीची निवड
मोसंबी साठी जमीन ही मध्यम भारी प्रतीचे तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी
फारच हलकी किंवा फारच भारी जमिनीत मोसंबी लागवड करू नाही, काळीच्या आणि पाण्याचा निचरा लवकर न होणाऱ्या जमिनीत मोसंबीच्या झाडांची लागवड करू नाही
मोसंबीची लागवड़ कशी करावी
मोसंबीच्या झाडांची लागवड हि १५ फूट बाय १५ फूट वर करावी किंवा १८ फूट बाय १५ फूट वर करावी आणि झाडांसाठी खड्डा हा २० ते 30 सेमी खोल ग्यावा रोप्याच्या मुलाची सिझे पाहून खड्डा ग्यावा, आणि खडुयामध्ये शक्य असेल तर कुजलेले शेणखत टाकावे
मोसंबी साठी हवामान
कमी पावसाच्या आणि मध्य प्रतीच्या हवामानात मोसंबीची पिके चांगल्या प्रकारे येते
मोसंबीच्या जाती
सालगुडी, न्युसेलर आणि काही देशी जाती सुद्धा आहे
मोसंबीच्या कलमांची निवड
- मोसंबी कलमे प्रत्यक्ष लावलेल्या जागेवर घ्यावे.
- कलमे सरळ वाढलेली जोमदार वाढलेली आणि ताजे असावे
- कलमे हि रोगमुक्त आणि बुरशी लागलेली नसावी .
- कलमांची उंची ही जमिनीपासून २ ते ३ फूट असावी.
- डोळा लावलेला भाग हा जमिनीपासून २३-३० सेमी उंच असावा
- मोसंबीची कलमे सरकारी किंवा नोंदणीकृत रोप वाटिकेतून खरेदी करावीत.
- जर अनुदानावर कलमे भेटणार असल्यावर कलमाची प्रतवारी निश्चित केल्यावरच खरेदी करावी त्यानंतर शासनाला बिल सादर करावे
मोसंबी साठी पाणी व्यवस्थापन
ठिबक पद्धतीने मोसंबीच्या झाडांना पाणी व खते दिल्यास अधिक फायदेशीर ठरते
पावसाळ्यात पाऊसाचा खंड पडल्यास १५ दिवसातून एकदा पाणी द्यावे
हिवाळ्यात १० ते १५ दिवसाने पाणी द्यावे
उन्हाळ्यात ५ ते १० दिवसाच्या फरकाने पाणी द्यावे
मोसंबी खत व्यवस्थापन
१ ते ४ वर्षापर्यंत मोसंबीच्या प्रति झाडासाठी खालील प्रमाणे रासायनीक खते द्यावीत
१ले वर्ष – 125 ग्रॅम: 125 ग्रॅम: 125 ग्रॅम (नत्र:स्फूरद:पालाश)
२ले वर्ष – 250 ग्रॅम: 250 ग्रॅम:250 ग्रॅम (नत्र:स्फूरद:पालाश)
३रे वर्ष – 500 ग्रॅम: 250 ग्रॅम:250 ग्रॅम (नत्र:स्फूरद:पालाश)
४थे वर्ष – 500 ग्रॅम: 250 ग्रॅम:250 ग्रॅम (नत्र:स्फूरद:पालाश)
5 वर्षानंतर – त्येक झाडास 10 ते 40 किलो शेणखत आणि 600 ग्रॅम नत्र 250 ग्रॅम स्फूरद व 250 ग्रॅम पालाश दरवर्षी द्यावे
मोसंबी लागवडी विषयी आधीक माहिती
मोसंबी लागवडी विषयी आधीक माहिती साठी खालील विषयी google वर माहिती शोधू शकतात