पेरू लागवड विषयी संपूर्ण माहिती
पेरू लागवड पेरूला जाम किंवा अमरूद असेही म्हणतात. पेरू हे एक आंबट गोडं फळ आहे .पेरूमध्ये “क” जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते .नियमित पेरू खाल्याने आपल्या शरीरात लोहाची कमतरता निर्माण होत नाही कारण त्याच्यातील “क” जीवनसत्व हे लोहाचे शोषण करण्यास मदत करते .पेरू लागवडीनंतर १८ महिन्यातच फळ येण्यास सुरुवात होते तर असे हे बहुगुणी पेरूची शेती कशी करावी याबद्दल जाणून घेऊ.
पेरू लागवडीसाठी जमीन कशी असावी
पेरू लागवडी साठी जमीन हि पाण्याचा निचरा होणारी तसेच मध्यम ते हलक्या प्रतीची असावी अशा जमिनीत मूळकूज होत नाही आणि रोपे बहरतात.
पेरूची जात कोणती निवडावी
पेरूसाठी सरदार (एल -49) हि जात निवडावी.
पेरू लागवडीसाठी जमीन कशी तयार करावी
सर्वप्रथम जमिनीची नांगरटी करून घ्यावी फन पाळी करून घ्यावी.
६० बाय ६० बाय ६० सेंटीमीटर चे खड्डे घेऊन त्यात सिंगल सुपर फोस्फट खात टाकावे ५० ते ६० ग्राम मॅलीथियन पावडर मिसळावी . रोप लागवड करताना ९ बाय ६ असे अंतर ठेवावे १ एकर शेतमद्धे जवळपास १००० झाडे लागवड करू शकतात.
पेरू लागवडीसाठी खते
शेणखताचा वापर करावा नत्र, स्फुरद, पालाश यांसारख्या खतांचा योग्य प्रमाणात वापर करावा.
पेरूवर पडणारे रोग आणि औषध फवारणी
पेरूला रोग शक्यतो पडत नाही परंतु उपाययोजना म्हणून महिन्यातून एकदा औषध फवारणी करावी त्यासाठी ९८० किंवा २२३०० चा वापर करावा. फलमाश्यांचा प्रादुर्भावाची रक्षक सापळ्यांचा वापर करावा. साल व शेंडा खाणारी अळी ,पिठ्या ढेकूण यासारखे कीटक यावर होतात. फळांवरील डागांसाठी बाविस्टीन + मॅन्कोझेब ची योग्य प्रमाणात फवारणी करावी. उन्हाळ्यात फळांचे अधिक उत्पादन मिळावे यासाठी २-४-५ टी ७० PPM या संजीवकाची फवारणी करावी.
बागेत भरपूर सूर्यप्रकाश मिळावा आणि हवा खेळती राहावी यासाठी फांद्यांची वेळोवेळी छाटणी करावी. पेरूला वर्षातून तीनदा बहार येतो बहाराची फुले जुने ऑक्टोबर आणि जानेवारी महिन्यात येतात स्थानिक परिस्थिती आणि मार्केटचा चांगला अभ्यास करून दोनदाच बहार घेतला तर उत्पादन अधिक चांगल्या प्रकारे मिळते.
अशाप्रकारे पेरूची बाग आपल्याला चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पादन वाढवते.