शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे २१ जून ते २५ जून या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार मुसळधार पावसाची शक्यता हवामान शास्र विभाग पुणे येथील वेध शाळेने वर्तवली आहे.
बऱ्याच दिवसापासून शेतकरी हा पावसाची वाट बघत आहे .१ जूनपासून राज्यातील काही भागाचा अपवाद वगळता सलग असा पाऊसच झालेला नाही .जून चा शेवट जवळ येत असताना देखील अद्याप वरुणराजा म्हणावा तसा बरसलेला नाहीये त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे .पावसाच्या विलंबामुळे बऱ्याच भागातील पेरण्या या लांबल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे महराष्ट्राच्या बऱ्याच भागात जोरदार पाऊस होणार आहे .
मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे . विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल तर काही ठिकाणी मेघगर्जना तसेच विजेच्या कडकडाटासह जोरदार मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
कोकण -गोव्याच्या बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे .
गोवा व दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर २१ जुन ते २५ जून मध्ये सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे .बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे .
तसेच मध्य महाराष्ट्राच्या तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्र विभाग पुणे येथील वेध शाळेने वर्तवली आहे.