जर गाईची निवडी मध्ये चूक झाली तर आपला व्यवसाय तोट्यात जाण्याचे १००% ग्र्याह्य धरले जाते, डेअरी फार्म मध्ये जनावरांची निवड हे सर्वात महत्वाचे असते कारण जनावरांच्या निवडीवर आपला व्यवसाय कसा होईल हे अवलंबून असते, खाली आम्ही काय माहिती दिली आहे ती आपण तपासून पाहू शकतात
- गाय , मैस शक्यतोदुसऱ्या वेतातील गाय निवडावी.
- गाय विकत घेतानाती चांगली चालवूनआणि फिरवून पहावी.
- छाती भरदार असावी.
- कमरेची हाडं दूरवरअसावीत.
- शांत स्वभावाची गाय वम्हशींची निवड करावी. तापट स्वभावाच्या गाईह्या पान्हा चोरताततापट स्वभावाच्या गाईकशी ओळखावी जीगाई हात लावल्यावरलगेच बाजूला होतेती शक्यतो तापटस्वभावाची असते.
- पाठीचा कणा सरळआणि मजबूत असावा.
- चारही सड सारख्याअंतरावर असावी आणि सारख्याआकाराचे असावे.
- कासेवर शिरांच जाळ असावं. शिरा जड आणिरुंद असाव्यात.
- कासेची शरीराशी बांधणी घट्टअसावी.
- गाई किंवा म्हशींची कासची हि त्वचामऊ असावी.
- मागील पाय हेबारीक असावे माझेती चांगले दुधाळआहे.
- दुध काढल्यानंतर कासेच आकारपूर्ववत लहान होणाराअसावा
- मागील दोन पायातकासेच्या मागे गॅपअसावा.
- गाई किंवा म्हशींची त्वचामऊ असावी तिचीत्वचा जाड नसावी.
- जातिवंत जनावराची निवड करावी.
- २-३ वेळा दुध काढून उत्पादनाची खात्री करून घ्यावी.
- गाई किना म्हशींची धार काढून पाहावे आणि चारही सडातील दुध काढून पाहावं.
- गाई हि भरपूर पाणी पिणारी असावी.
- गाई डोळ्यात पाणी येणारी नसावी.
- गाई हि मारणारी नसावी ती शांत स्वभावाची असावी.
- गाई हि चोकुण्डल नसावी तिने सर्व खाद्य खाणारी असावी.
- तिचे मायांग बाहेर पडत नाही याची खात्री केलेली असावी.
- वाईट खोडीची नसावी उदा. माती खाणारी, प्लास्टिक खाणारी ईत्यादी.
- तिला कोणताही रोग नसणारी घ्यावी.
- शकतो गाभण घेणापेक्षा व्यालेली गाई वासरं सोबत विकत घ्यावी.
- कमीत कमी एका वेळी ६ ते १० लिटर दुध देणारी असावी.
- जास्त वयस्कर गाई घेऊ नये.
- गाई चा मालक ओळखीचा असल्यास फादेशीर असते.
- गाई हि जातिवंतच घ्यावी.