कोंबडी पालन वा कुकूटपालन हा व्यवसाय शेती पूरक असल्यामुळे शेतकऱ्यांना परवडण्यासारखा आहे. कमी खर्चात आणि कमी जागेत हा व्यवसाय होत असल्याने बरेच शेतकरी कुक्कुटपालनाकडे वळत आहेत ब्रॉयलर पेक्षा गावरान कोंबडी पालन किंवा कुक्कुटपालन या विषयामधें पशुपालक जास्त प्रमाणात वळत आहेत यात नियमित उत्पन्न देणारा गावरान कोंबडी उत्पादन हा व्यवसाय जोडधंदा म्हणून करत आहेत .स्वच्छ पाणी योग्य आहार आणि वेळापत्रकानुसार लसीकरण पुरवल्यास घरच्या घरी कोंबडीपालन हा जोडधंदा भरपूर नफ्यात शेतकरी करू शकतात
 

आपला भारत देशहा कृषी प्रधान देश आहे .बरेच शेतकरी शेतीला पूरक जोडधंदा करतात आणि भरपूर नफा कमवतात .तसाच एक फायदेशीर व्यवसाय म्हणजे कोंबडी पालन वा कुकूटपालन हा व्यवसाय शेती पूरक असल्यामुळे शेतकऱ्यांना परवडण्यासारखा आहे, आज आपण पाहू कि कोंबडी पालन साठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीविषयी माहिती

 • गावरान कोंबडीच्या जाती
 • जास्त अंडी देणाऱ्या कोंबडीच्या जाती
 • कोंबडी पालन व्यवसाय कसा करावा
 • कोंबडी पालन मुक्त संचार पद्धत
 • कोंबडी पालनासाठी शेड कसे उभारावे
 • कोंबडीच्या पिलांचे नियोजन कसे करावे
 • ब्रुडिंग
 • ब्रुडिंग करताना घायची काळजी

१ दिवसाच्या पैलूंची काळजी कशी घ्यावी

ग्रोविंग

लेयिंग

मौल्टिंग स्टेज

 • कोंबडी पालनसाठी लागणारा खर्च आणि उत्पादन

गावरान कोंबडी जाती

कडकनाथ

कडकनाथ जाती ह्या मध्यप्रदेशातील धार आणि जिभोवा जिल्यातल्या आदिवासी समाजाने ओळख करून दिलेली आहे .हि कोंबडी रंगाने गडद काली ,तुरा गुलाबी लाल, रक्त आणि अंडीसुद्धा काळसर रंगाचे असते .ह्यात कॅल्शिअम ,प्रोटीन आणि लोह मोठ्या प्रमाणात असते. ह्या कोंबडीची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असते. औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध देशी वाण, धीमी वजन वाढ, परंतु पौष्टिक आहे . 5 महिन्यात 1 किलो वाढ होते आणि एक चक्रात 60 ते 80 अंडी उत्पादन मिळते. हि जाती अतिशय काटक असून उत्तम रोगप्रतिकार शक्ति अंगभूत असलेल्या आहेत.

गिरीराज

कर्नाटकातील बंगलोर मधून ह्या जातीचा उगम झालेला आहे .गावरान कोंबडीसारखीच हि जात आहे ह्या कोंबडीचे 2 महिन्यात 1 किलो वजन वाढते अणि एक अंडी चक्रात 150 अंडी उत्पादन मिळते.

वनराज

भारतात व महाराष्ट्रात सगळीकडेच हि जात आढळते ह्या कोंबडीचे 2 महिन्यात 1 किलो वजन वाढ होते अणि एका अंडी चक्रात 120 ते 160 अंडी उत्पादन मिळते .

ग्रामप्रिया

हि कोकणामध्ये आढळणारी जात आहे .१८० ते २०० अंडी मिळते.

ब्रम्हा

हि जात मूळची ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील जात आहे .अंगाने थोराड ,रंगाने राखी वा काली आहे .पिसे भरपूर असतात .

ब्रॉयलर मध्ये कोंबड्यांच्या २ जाती आहेत

लेबर्ड

मीटबर्ड
 

जास्त अंडी देणाऱ्या जाती

ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये जास्त अंडी देणाऱ्या काही जाती आहेत त्या खालीलप्रमाणे:-

 • रेड लेगहॉर्न
 • ब्राउन लेगहॉर्न
 • व्हाईट लेगहॉर्न
 • ब्लॅक लेगहॉर्न
 • आंकॉना
 • मिनॉर्क
 • ऑस्ट्रलॉर्प

कोंबडी पालन व्यवसाय कसा करावा

कुकुटपालन करताना जातीची निवड हि तुम्ही कोणत्या मार्केट साठी व्यवसाय करणार आहेत यावर अवलंबून आहे .अंडी आणि मास उत्पादन हे काहींचे उद्दिष्ट असू शकते .देशी किंवा गावरान क्रॉस जाती ह्या अतिशय काटक आणि रोगप्रतिकारक्षम असतात

कोंबडी पालन मुक्त संचार पद्धत

या पद्धतीचा अवलंब केल्याने मजुरांवरील आणि खाद्यावरील खर्च कमी लागतो .कोंबड्या मोकळ्या सोडल्यास उत्पादन खर्च प्रति अंडे आणि प्रति पिल्लू कमी होतो .सुरवातीचे ३ आठवडे पिलांची काळजी घेतली जाते .पक्षांना ब्रूड केले जाते .अंगावर पंख तयार होताच मुक्त संचार करण्यास सोडले जाते .स्वतःच अन्न शोधून किडे कोवळे गवत खाऊ लागतात .मुक्त संचार पद्धतीमुळे फक्त रात्रीच कोंबड्या शेड मध्ये येतात त्यामुळे स्वच्छता ठेवण्यास सोपे जाते

 

कोंबडी पालनासाठी शेड कसे उभारावे

शेतामध्ये शेड ची उभारणी करावी

साधारणपणे १.५० sqare feet प्रतिपक्षी याप्रमाणे पक्या शेडची उभारणी करावी .शेडला ३ फूट उंच भिंत बांधावी .मध्यभागी १२ ते १३ फूट उंच आणि दोन्ही बाजूस १० ते ११ फूट उंची ठेवावी .चिकन मेष जाळीच्या मदतीने शेड बंदिस्त करावे.

कोंबडीच्या पिलांचे नियोजन कसे करावे

पहिल्या दिवसापासून नीट नियोजन करावे .गावरान अंडी उत्पादन व्यवसायासाठी ४ टप्प्यामध्ये नियोजन करावे लागते .गावरान जातीची किंवा गावरान क्रॉस जातीची एक दिवसाची पिले घेऊन सुरुवात करावी .आपण राहत असलेल्या नजीकच्या मध्यवर्ती अंडी उत्पादन केंद्रातून पिलू खरेदी करावी .१०० पिलू एका बॉक्स मध्ये पॅक करून हि पिल्ली दिली जातात .पिल्ले निरोगी व चपळ असावीत तसेच त्यांना मरेक्स प्लस दिल्याची खात्री करावी

ब्रुडिंग

पिल्लाला कृत्रिम रित्या उष्णता दिली जाते या प्रोसेस ला ब्रुडिंग असे म्हणतात .एक दिवसाच्या पिलाच्या अंगावर पिसे नसतात त्यामुळे त्याला तापमान नियंत्रण करता येत नाही .२ वॅट प्रति पिल्लू उष्णता त्याला ब्रुडर मधून दिली जाते .बांबूची किंवा प्लास्टिक ची साधी टोपली वापरून ब्रुडर तयार करता येतो .४ फूट व्यासाची २ फूट उंचीची टोपली २५० पिलांसाठी वापरता येते .पत्रे वापरूनही ब्रुडर तयार करता येतो .

ब्रुडिंग करताना घायची काळजी
 

ब्रुडरचे तापमान योग्य ठेवावे .गंभोरा ,लासोटा ,फौलपॉक्स ,इन्फेकशन ब्रॉन्कायटिस या लसी द्याव्या .

योग्य जीवनसत्व देण्यात यावी .स्टार्टर म्हणजेच १९ % प्रोटीनयुक्त योग्य आहार द्यावा २१ दिवस पूर्ण झाल्यावर पिल्लू ब्रुडर मधून लिटर वर हार्डेनिंग साठी सोडून थोडी जागा वाढवावी

१ दिवसाच्या पैलूंची काळजी कशी घ्यावी

 

१ लिटर उकळलेल्या पाण्यात १०० ग्राम गूळ किंवा इलेकट्रोल पावडर मिक्स करून थंड करून घ्यावे .हे गुलपणी पिणे पिलनसाठी महत्वाचे आहे .आता प्रत्येक पिलाची चोच ३ ते ४ वेळा यात बुडून त्याला पाणी प्यायला शिकवावे आणि तापमान निश्चित केलेल्या ब्रुडरमध्ये सोडावे .४ तासानंतर मक्का भरडा किंवा तांदळाची कणी खाऊ घालावी दुसऱ्या दिवशी चिक स्टार्टर द्यावे .साधारणपणे २१ दिवस ब्रुडिंग करावे .यानंतर पिलांच्या अंगावर पिसे तयार होऊ लागतात त्यामूले ते स्वतःचे तापमान नियंत्रण करू शकतात यापुढे काही दिवस पिलू शेडमध्ये सोडावे व नंतर कंपाऊंड मध्ये मोकळे सोडावे .पिलांना १ महिना पूर्ण होताच चिक फिनिशेर हे खाद्य सुरु करावे .

ग्रोविंग

ग्रोविंग स्टेज मध्ये पक्षांची वाढ घ्यायची असते .नर आणि मादी पक्षी वेगळे करावेत .अनावश्यक नर मास उत्पादनासाठी स्वतंत्र वाढवावेत .याचा कालावधी ४ ते ५ महिन्यांचा असतो .या स्टेज मध्ये शरीराची योग्य वाढ होणे महत्वाचे असते त्यासाठी मुक्त संचार करू द्यावा व १५% प्रोटीन असलेले ग्रोवर फीड खाऊ घालावे .लासोटा आणि फॉलपॉक्स बुस्टर या लसी द्याव्या .
 

लेयिंग

लेयिंग म्हणजेच अंडी घालणे .वयाच्या २४ आठवड्यानंतर पक्षी अंडी घालतात आणि ७२ आठवड्यापर्यंत उत्पादन घ्यायचे असते .याच काळात पक्षांना लेयिंग मेष हा प्रोटीन युक्त आहार द्यावा.५%कॅल्सिम द्यावे अंडी घालण्यासाठी नेस्ट बॉक्स पुरवावे

मौल्टिंग स्टेज

७२ आठवड्यानंतर पक्षी आपली पिसे गळू लागतात .अंडी उत्पादन मिळत नसते

कोंबडी पालनसाठी लागणारा खर्च आणि उत्पादन

१ दिवसाचे पिलू अंडी घालण्या पर्यंत १४० ते १५० खर्च येतो .एका अंड्याला बाजारामध्ये ७ ते ८ रुपयाचा भाव असतो यावर आपल्याला २ ते ३ रुपयाचा खर्च आलेला असतो .७२ आठवड्यानंतर पक्षांना कत्तल करण्यास द्यावे एका पक्षामागे १५० ते २०० रुपये मिळतात .

One thought on “गावरान कोंबडी पालन कसे करावे व त्याचे फायदे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *