शेतकरी मी

गहू लागवड व खत व्यवस्थापन कसे करावे

गहू लागवड व खत व्यवस्थापन कसे करावे

 

गहू हे रबी मध्ये येणारे एक धान्य पीक आहे, भारतात गहुचा वापर हा सर्वात जास्त आहे आणि भारत हा एक सर्वात जास्त गहू उत्पादन करणारा देश मानून ओळखला जातो

आज आपण पाहू कि गहूचे पीक कसे घ्यावे आणि त्यासाठी कोणत्या कोणत्या मशागती करावी लागते याचबरोबर खत अँड पाणी व्यवस्थापन कसे करावे हे आपुन खाली दिलेल्या सूचीनुसार पाहू

जमीन

पेरणी

हवामान

गव्हाचे सुधारित वाण

गव्हाचे खत व्यवस्थापन

गव्हाचे पाणी व्यवस्थापन

गव्हावरील किडी त्यांचे व्यवस्थापन

गव्हावरील रोग व त्यांचे व्यवस्थापन

गहू साठी आंतरमशागत




 

जमीन

गहू हे हलक्या व मध्यम जमिनीत पीक मानून घेता येऊ शकतात.

पेरणी

ऑक्टोबरच्या दुस-या आठवड्यापासून ते डिसेंबर च्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी, पेरणीतील अंतर २२ ते २३ सें.मी. नुसार करावी. गहू चे बिया ह्या पेक्षा जास्त खोल पेरू नये. शक्य असल्यास दुहेरी पेरणी करू नाही, पेरणी करताना पेरणी बरोबर खताची मात्र दिल्यास चांगले राहते, एकेरी पेरणीमुळे आंतरमशागत करणे सुलभ होते. पेरणी शक्यतो दोन चाडी पाभरीने करावी. म्हणजे पेरणी साठी अंदाजे १०० ते १५० किलो बियाणे वापरावे.

हवामान

गहू साठी थंड हवामान चांगले मानवते

गव्हाचे सुधारित वाण

कोरडवाहू जमिनीसाठी गव्हाचे वाण

  • एन ५९
  • एन आय ४५३९
  • एमएसीएस १९६७
  • एकेडीडब्लू २९९७-१६(शरद)

बागायती उशिरा पेरणीसाठी गव्हाचे वाण

  • एचडी २५०१
  • एकेडब्ल्यू ३८१
  • एच आय ९९९
  • एनआयएडब्ल्यू ३४
  • पूर्णा (एकेडब्ल्यू १०७१)

बागायती जमिनीसाठी गव्हाचे वाण

  • एमएसीएस २४९६
  • एकेएडब्ल्यू ३७२२ (विमल)
  • एचडी २१८९ आणि २३८०
  • पूर्णा (एकेडब्लू १०७९)
  • एमएसीएस२८४६




 

गव्हाचे खत व्यवस्थापन

गव्हाची उशीरा पेरणी केली असेल तर हेक्टरी ६० ते ८० किलो स्फुरद आणि ३० ते ३५ किलो पालाश ही खते दोन हप्त्यात द्यावे.

जिरायत गव्हास पेरणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश द्यावे.

बागायती गव्हास पेरणीसाठी हेक्टरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे.

निम्मे नत्र व संपुर्ण स्फुरद व पालाश पेरणीचेवेळी पेरून द्यावे. उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर द्यावे.

गव्हाचे पाणी व्यवस्थापन

पाण्याची पाळी हि जमिनीच्या प्रति नुसार आणि पिकाच्या अवस्थेनुसार आणि वातावरण नुसार द्यावी लागते

गव्हावरील किडी त्यांचे व्यवस्थापन

गहूच्या पिकावर साधारण खोड किडी, तुडतुडे, मावा, वाळवी तर प्राण्यामध्ये उंदराचा प्रादुर्भाव होतो

तुडतुडे:

तुडतुडे हे आकारने लहान आकाराचे असतात आणि त्यांचा रंग हिरवट राखडी असतो. तुडतुडे आणि त्यांची पिल्ले हि पानातुन रस शोषण करतात. आणि त्यामुळे पानाचा रंग हा पिवळसर पडुन ती वाळु लागतात व पिकांची वाढ खुंटते, कार्बारील वापरून तुडतुडे वर नियंत्रण मिळवता येते

मावा:

हेकिटक लाब व वर्तुळाकार असते या किडीचे पिल्ले व प्रौढ मावा पानातुन व कोवळ्या शेंड्यातुन रस शोषन करतात. तसेच आपल्या शरीरातुन मधासाखा गोडव चिकट पदार्थ सोडतात. व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते.या किडीचे नियंत्रण मिथाईल डिमेटाईल वपूं करता येते

खोडकिडा:

या किडीचे पतंग तपकिरी रंगाचे व गवती रंगाचे असतात. पुर्ण वाढ झालेली अळी सुमारे २-३ से.मि असुन तिचा रंग गुलाबी असते. या किडीमुळे गहुचा मधला भाग सुकुन जातो. हा किडा खोडात शिरुन खालील खाऊन घेते . त्यामुळे रोपे सुकुन जातात. व त्यांना ओंब्या येत नाही. कार्बारील वापरून तुडतुडे वर नियंत्रण मिळवता येते

वाळवी:

वाळवीही कीड गव्हाच्या रोपाची मुळे खाते. व त्यामुळे रोपे वाळतात. व व सपुर्ण रोप मारून जाते. वाळवी बंदोबस्त करण्यासाठी बांधावर असलेली किंवा शेतात असलेली वारूळे खणुन काढावित. व त्यातील राणीचा किडीचा शोध घेऊन मारून टाकावे.

उंदीर:

उंदीर हे गव्हाचे फुटवे व ओंब्या तोडून खातात आणि बिळात साठवितात त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते . उंदीरांचा बंदोबस्त करण्यासाठी विषयुक्त गोळ्या बिळा पाशी ठेवून द्याव्या




 

गव्हावरील रोग व त्यांचे व्यवस्थापन

काणी / काजळी :

या रोगामुळे ओंब्यामध्ये दाण्याऐवजी काळी भुकटी तयार होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास व्हिटॅव्हॅक्स किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची बिज प्रक्रिया करावी, तसेच शेतातील रोगट झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत.

करपाः

गव्हावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाचे प्रादुर्भाव दिसताच मॅन्कोझेब हे बुरशीनाशकची फवारणी करावी

तांबेरा:

तांबेरा या रोगामुळे गहूच्या पानांवर नारिंगी रंगाचे फोड सारखे येतात, न्हात ते कालांतराने काळे पडतात. या फोडांमध्ये बुरशीची बीजे असतात. तांबे-यापासून नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधक वानांचा वापर करावा.

 

गहू साठी आंतरमशागत

  • प्रत्येक १५ दिवसाला पिकामध्ये एक पाळी मारावी.
  • पिकाला आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
  • पिकाला आवश्यकतेनुसार खत द्यावे.
  • पिकाला आवश्यकतेनुसार रोगाच्या आणि किडीच्या नियंत्रणासाठी योग्य ती फवारणी करावी.
  • पीक मध्ये गावात वाढणार नाही याची काळजी ग्यावी आणि नियमित खुरपणी करावी.

 

Exit mobile version