शिवसेनेपासून वेगळा झालेला एकनाथ शिंदे यांचा गट ४० पेक्षा जास्त आमदारांसह गोव्यात जाणार आहे .एकनाथ शिंदेंच्या गटाने आज गुवाहाटीतील कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे. दुपारी ३ नंतर ते गुवाहाटी सोडणार आहेत. यानंतर ते गोव्याला जाण्यासाठी रवाना होणार आहेत.
ताज कन्व्हेन्शन हॉटेलमध्ये आमदारांसाठी 71 खोल्या बुक करण्यात आलेल्या आहेत. येथूनच हे आमदार बहुमत चाचणीसाठी मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उद्या सकाळी म्हणजेच 30 जून रोजी सकाळी ११ वाजता फ्लोअर टेस्टसाठी विशेष अधिवेशन होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ते 5 वाजण्यापूर्वी पूर्ण करावे असे आदेश राज्यपालांनी दिलेले आहेत.
एकीकडे शिवसेनेचे सुनील प्रभु यांनी राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावलेल्या अधिवेशनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज संध्याकाळी 5 वाजता सुनावणी होणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी नवे ट्वीट केले आहे त्यांनी आसामच्या पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांतर्फे आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाखांची मदत जाहीर केली आहे.
एकनाथ शिंदे गटामध्ये सामील असणाऱ्या आमदारांची नावे खालीलप्रमाणे आहेत
- संजय रायमूलकर
- बालाजी कल्याणकर
- शांताराम मोरे
- शहाजी पाटील
- अब्दुल सत्तार
- शंभुराज देसाई
- अनिल बाबर
- तानाजी सावंत
- संदीपान भुमरे
- चिमणराव पाटील
- प्रकाश सुर्वे
- भरत गोगावले
- विश्वनाथ भोईर
- संजय गायकवाड
- प्रताप सरनाईक
- राजकुमार पटेल
- राजेंद्र पाटील
- महेंद्र दळवी
- महेंद्र थोरवे
- प्रदीप जयस्वाल
- ज्ञानराज चौगुले
- श्रीनिवास वनगा
- महेश शिंदे
- लता सोनावणे
- किशोरी पाटील
- रमेश बोरणारे
- सुहासे कांदे
- बालाजी किणीकर
- उदय सामंत
- संजय शिरसाट
- गुलाबराव पाटील
- प्रकाश आबिटकर
- योगेश कदम
- आशिष जयस्वाल
- सदा सरवणकर
- मंगेश कुडाळकर
- दीपक केसरकर
- यामिनि जाधव
एकनाथ शिंदे गटामध्ये सामील असणाऱ्या अपक्ष आमदारांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
- चंद्रकांत पाटील
- नरेंद्र भोंडेकर
- किशोर जोरगेवार
- बच्चू कडू
- राजकुमार पटेल
- राजेंद्र यड्रावकर
- मंजुळा गावित
- विनोद अग्रवाल
- गीता जैन