आंबा पीक विमा योजना

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, विविध नैसर्गिक आपत्ती पिकांवर पडणारी कीड यातून शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसान होतं यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे व प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकार विविध योजना राबवत असते. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये टिकून राहावे, शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे हा त्यामागचा उद्देश असतो. प्रधानमंत्री पिक विमा योजना ही 13 जानेवारी 2016 पासून सरकारतर्फे सुरू करण्यात आली आहे

 काय आहे आंबा पिक विमा योजना

मृग आणि आंब्या बहार या हवामान आधारावर ही पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे .

आंबिया बहार फळे कोणकोणती असतात?

संत्री, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, द्राक्ष, केळी, पपई, स्ट्रॉबेरी इत्यादी फळांचा समावेश होतो.

मृग बहार फळे कोणकोणती असतात?

डाळिंब, संत्रा, मोसंबी,पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष इत्यादी फळांचा समावेश होतो.

पिक विमा साठी अर्ज कोठे करायचा?

पिक विमा साठी चा अर्ज हा ऑफलाइन किंवा ऑनलाईन करता येतो.

www.pmfby.gov.in पोर्टलवर जाऊन पिक विमा संबंधीचा अर्ज भरायचा असतो. ज्या जिल्ह्यांकरता जेवढा हप्ता असेल तेवढा हप्ता भरायचा असतो.

नियम व अटी

फळबाग ही किमान पाच वर्षाची असावी.

फळबागेचा फोटो अपलोड करावा.

तुम्ही जर भाडे तत्त्वावर जमीन घेतली असेल तर त्याची कागदपत्रे पाठवावी.

वेदर ट्रिगर रिपोर्टनुसार जास्त तापमान, कमी तापमान, वेगाचा वारा यांसारख्या घटना मुळे फळबागेचे नुकसान झाले असल्यास संबंधित विमा कंपनीला 72 तासांच्या आत फोन करून कळवावे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम नंतर जमा होते.

वातावरणातील घटकातील बदलांमुळे पिकावर परिणाम होतो याबद्दल निश्चित हवामानाचा धोका लक्षात घेऊन सहभाग घ्यावा.

आंबा पिक विमा कोकण विभाग प्रमाणके

 संबंधित जिल्हे :-ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग, विमा संरक्षण प्रकार व विमा संरक्षण कालावधी  खालील प्रमाणे आहे.

दिनांक 1 डिसेंबर ते 31 मार्च (अवेळी पाऊस)

यादरम्यान जर का अवेळी पाऊस झाला असेल आणि एक दिवसात 5 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला असल्यास सात हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येते .

सलग दोन दिवस 5 मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास बारा हजार सहाशे रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल.

दिनांक 1 एप्रिल ते 15 मे (अवेळी पाऊस)

यादरम्यान एका दिवसात 10 मि.मि किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास 8500 /- नुकसान भरपाई देण्यात येईल .

दोन दिवस 10 मि.मि किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला असल्यास 15400 /-रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल.

1 जानेवारी ते 10 मार्च (कमी तापमान)

सलग तीन दिवस 13 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल.

सलग चार दिवस 13 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास 9900 नुकसान भरपाई देण्यात येईल.

सलग पाच दिवस 13 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास 14 हजार 100 रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल.

सलग सहा दिवस 13 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास 19 हजार 100 रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल.

सलग सात दिवस 13 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमाना राहील्यास 28 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल.

आंबा फळपीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख कोकण वगळता इतर जिल्हे यासाठी 31 डिसेंबर आहे वेळी पाऊस 1 डिसेंबर ते 15 मे

कमी तापमान 1 जानेवारी ते 10 मार्च

जास्त तापमान 1 मार्च ते 15 मे

वरील विमा संरक्षण कालावधीसाठी विमा संरक्षित रक्कम 140000 रुपये इतकी आहे.

गारपीट या विमा संरक्षण प्रकारामध्ये 1 फेब्रुवारी ते 31 मे या कालावधीसाठी 46 हजार 667 रुपये इतकी विमा संरक्षण रक्कम देण्यात येईल.

कोकण वगळता इतर जिल्हे

अवेळी पाऊस 1 जानेवारी ते 31 मे

कमी तापमान 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी

जास्त तापमान 1 मार्च ते 31 मार्च

वरील विमा संरक्षण कालावधीसाठी विमा संरक्षित रक्कम 140000/- रुपये इतकी आहे.