मराठवाडा सोडून सगळीकडे पावसाची जोरदार बॅटिंग

शेतकरी मी 

महाराष्ट्र राज्यात सगळीकडे जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे पण अद्यापही मराठवाडा पावसाच्या प्रतीक्षेत आहे.त्यामुळे इथला शेतकरी चिंतेत दिसून येत आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीनही ठिकाणी अनेक नद्या नाले हे दुथडी भरून वाहू लागले आहेत. कोकणात तर एन डी आर एफ टीमला बोलावण्यात आलेले आहे

परंतु मराठवाड्यामध्ये या उलट चित्र दिसून येत आहे पावसाअभावी इथला शेतकरी आभाळाकडे डोळे लावून आहे.

येत्या आठ दिवसात मराठवाड्यात चांगला पाऊस पडणार आहे अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसे पाहता मागच्या काही दिवसांपासून हा अंदाज खरा ठरलेला नाहीये.

गेल्या दोन आठवड्यापासून तुरळक पाऊस मराठवाड्यामध्ये झालेला आहे परंतु येत्या आठ दिवसात वादळ वारा व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .

मराठवाड्यात औरंगाबाद ,लातूर, जालना परभणी बीड नांदेड उस्मानाबाद या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

Thank You!